आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई । तब्बल ५० वर्षे व्यंगचित्रकलेची सेवा करणारे व राजकीय व्यंग हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. सबनीस आठवडाभर रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर त्यांना माहीम येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...