Home | Maharashtra | Vidarva | Akola | case against that 8 people

'त्या' आठ जणांविरुद्ध अखेर गुन्हे दाखल

प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 09:37 AM IST

शेतातील प्लॉटच्या विक्रीबाबत गैरप्रकार

  • case against that 8 people


    यवतमाळ- शेतातील प्लॉटच्या विक्रीबाबत गैरप्रकार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सहदुय्यम निबंधक कार्यालयातील लिपीकासह सात जणांविरुद्ध शनिवार, दि. ८ डिसेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले. या प्रकरणी जयप्रकाश सोधी यांनी तक्रार दाखल केली होती.


    या प्रकरणी पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसर, शेतातील प्लॉटच्या विक्रीबाबत गैरप्रकार झाल्याची घटना जुन २०१८ रोजी उघडकीस आल्याने या प्रकरणी जयप्रकाश सोधी रा. पुष्पकुंज सोसायटी यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता न्यायदंडाधिकारी प्र.वर्ग यांनी लेखी आदेश दिले. त्यावरून शनिवार, दि. ८ डिसेंबर रोजी सहदुय्यम निबंधक कार्यालयातील लिपीकासह सात जणांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहे. दिपक पाटील, उल्हास पाटील, लिना पाटील, सिमा पाटील, शांता पाटील, मनिष जयस्वाल, गोपाल बख्तीयार आणि सहदुय्यम निबंधक वर्ग एक आणि दोन तथा मुद्रांक कार्यालयातील वरिष्ठ लिपीका विद्या तळेगावकर अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहे. या प्रकरणाचा पुढिल तपास पोलिस करत आहेत.

Trending