आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्या लेखिकेविरोधात परभणीमध्ये गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा वतीने एकात्मिक पूरक वाचन योजनेंतर्गत शाळेला पुरवण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात महापुरुषाबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याप्रकरणी लेखिका, प्रकाशक व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण विभागातील अधिकारी यांच्यावर संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


लेखिका शुभा साठे यांनी या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर महापुरुषाबद्दल कोणतेही ऐतिहासिक पुरावे न देता बदनामीकारक लिखाण केले आहे. म्हणून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आक्षेप घेऊन राज्यातील शाळांना वितरित करण्यात आलेले पुस्तकावर तत्काळ बंदी घालून हे पुस्तक मागे घेण्याची मागणी लावून धरली होती. 


दरम्यान, शहरातील नागरिकांच्या मनात भावना तीव्र झाल्या होत्या यातूनच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काजळे यांच्या फिर्यादीवरून लेखिका शुभा शशांक साठे,पुस्तकाचे लाखे प्रकाशक व विद्या प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...