आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षवर्धन जाधवांना उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह टीका भोवली: आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्याबाबत केलेलं वक्तव्य आता त्यांच्या अंगलट येण्याचा मार्गावर आहे. हर्षवर्धन जाधवांच्या त्या व्यक्तव्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहिता प्रमुखांकडे तक्रार दिली असून हर्षवर्धन जाधवांविरोधात कन्नड पोलिस ठाण्यांमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता पथकप्रमुख राममहेंद्र डोंगरदिवे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 188 प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हर्षवर्धन जाधव यांनी तीन दिवसांपूर्वी एक प्रचार सभेत उद्धव ठाकरेंवर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. तेव्हापासून त्यांनी शिवसैनिकांची नाराजी ओढावून घेतली. हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात आरोपात औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नगरसेवक राज वैद्य यांनी ही तक्रार केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...