आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Case Filed Against 49 People Who Wrote Open Letter To PM Narendra Modi In Mob Linking Case

मॉब लिंचिंग प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहणाऱ्या 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपूर- मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहीणारे 49 लोकांविरुद्ध गुरुवारी मुजफ्फरपूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात रामचंद्र गुहा, मणिरत्नम, अनुराग कश्यप, श्याम बेनेगल आणि अपर्णा सेनसहित अनेकजणांचा समावेश आहे. स्थानीक वकील सुधीर कुमार ओझा यांच्याकडून 2 महीन्यांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेवर मुख्य न्यायिक मेजिस्ट्रेट (सीजेएम) सूर्यकांत तिवारी यांच्या आदेशानंतर तक्रार दाखल करण्यात आली.ओझा म्हणाले की, सीजेएमने 20 ऑगस्टला माझी याचिका स्वीकार झाली. 3 ऑक्टोबरला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मोदींना लिहीलेल्या खुल्या पत्रात स्वाक्षरी करणाऱ्या 49 हस्तिंना याचिकेत आरोपी बनवले आहे. त्यांच्यावर देशाची छवी मलीन करणे आणि फुटिरतावादी प्रवृत्तीला चालना देण्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, भारतीय दंड विधान(आयपीसी) च्या अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात धार्मिक भावनांना ठेस पोहचवणे, राजद्रोह, शांती भंग करण, यांसारखे आरोप आहेत.

चित्रपट निर्माते मणि रतनम, अनुराग कश्यपसहित 49 बड्या हस्ती
कला, साहित्य आणि इतर क्षेत्रांशी निगडीत 49 हस्तींनी 23 जुलैला मोदींच्या नावे खुले पत्र लिहीले होते. यात मुस्लिम, दलित आणि इतर समुदायांवर अनेक लोकांनी मारहाण (मॉब लिंचिंग) करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या चिठ्ठीत अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गलसारख्या अनेक क्षेत्रातील दिग्गत हस्ती होते. दरम्यान, सरकारने पत्रामधील आरोपांचे खंडन केले होते.