आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Case Filed Against Actor Anupam Kher Over The Accidental Prime Minister Movie

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेता अनुपम खेर यांच्या विरोधात खटला दाखल, माजी पंतप्रधानांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - अभिनेता अनुपम खेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात बिहारमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटातून त्या सर्वांनी काही वरिष्ठ नेत्यांची प्रतिमा मलीन केली असा आरोप लावण्यात आला आहे. अॅड. सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरनगर न्यायालयात बुधवारी हा खटला दाखल केला. कोर्टाने या प्रकरणी सुनावणीसाठी 8 जानेवारीची तारीख निश्चित केली आहे.


अभिनेते अनुपम खेर यांनी या चित्रपटात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अक्षय खन्नाने पंतप्रधानांचे माजी सल्लागार संजय बारु यांची भूमिका साकारली आहे. या दोघांनीही चित्रपटातून सिंग आणि बारु यांची प्रतिमा मलीन केली. सोबतच, अनेक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असा उल्लेख अॅड. ओझा यांनी आपल्या याचिकेत केला आहे. यासोबतच इतर कलाकारांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियांका गांधी-वाड्रा यांची भूमिका साकारली आहे. त्या सर्वांनी या लोकांची समाजात प्रतिमा मलीन केली असे सांगताना ओझा यांनी चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल केली आहे.