आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा प्रचार करणाऱ्या महाराजांना बजरंग जाधव, निलंगेकरांची मारहाण, गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - अटीतटीची लढत सुरू असलेल्या औसा मतदारसंघात शुक्रवारी रात्री एका वारकरी संप्रदायाच्या महाराजांनी आपल्याला भाजपचा प्रचार का करतो आहेस असं विचारत अपक्ष उमेदवार बजरंग जाधव आणि अरविंद निलंगेकरांनी बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याची तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आपल्या घरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासावेत. आपण कोणाला मारहाण केली नाही. ज्यांनी आरोप केलाय त्यांना मी साधा भेटलोही नाही. आपल्याला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र असल्याचा खुलासा केला.

औसा मतदारसंघात भाजपकडून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार आणि काँग्रेसचे बसवराज पाटील यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. त्यातच भाजपचे जिप कृषि सभापती बजरंग जाधव यांनी बंडखोरी केल्यामुळे आणि त्यांना भाजपच्या अरविंद निलंगेकरांचा पाठिंबा असल्यामुळे औशातील निवडणूक वादग्रस्त बनली आहे. त्यातच किशोर जाधव या कीर्तनकार महाराजांनी शुक्रवारी रात्री औसा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये अपक्ष उमेदवार बजरंग जाधव यांनी आपल्याला पाठिंबा द्या असे सांगत आपल्याला बळजबरीने एका गाडीत बसवले. तेथून आपल्याला निलंगेकरांच्या बंगल्यावर नेले. तेथे बजरंग जाधव आणि अरविंद निलंगेकरांनी धमकावले. मारहाण केली आणि पाठिंबा दिल्याचे वदवून घेतले, असे या तक्रारीत म्हटले आहे. यावरून बजरंग जाधव व अरविंद निलंगेकरांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंगेकरांनी आरोप फेटाळले : या प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अरविंद निलंगेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...