विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंना धक्का, आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आदेश

सरकारी बंगल्याचा गैरवापर केल्याचे समोर आले.

दिव्य मराठी वेब टीम

Apr 12,2019 05:39:00 PM IST

मुंबई- विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहिरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला, तपासात तसे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पोलिस आता याबाबत कारवाई करतील, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरमाना प्रसिद्ध करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या बी 4 या सरकारी बंगल्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आचारसंहिता लागू असताना सरकारी मालमत्तेचा वापर करता येत नाही. त्यामुळेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीविरोधात तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने यासंबंधी चौकशीचे आदेश दिले होते आणि तपासानंतर सरकारी बंगल्याचा गैरवापर केल्याचे समोर आले.

X
COMMENT