आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री रूममध्ये रडत होती मुलगी, आईने कारण विचारल्यावर मुलीने सांगितले बापाचे लाजिरवाणे कृत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा(उत्तर प्रदेश)- येथील गोवर्धन परिसरात लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. एका महिलाने आपल्या पतीवर आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. महिलेच्या सांगण्यावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.  राधाकुंडच्या एका कॉलनीत एक बाप आपल्याच 15 वर्षीय मुलीवर अनेक दिवसांपासून बलात्कार करत होता. 1 वर्षांपासून सहन करणारी मुलगी एके दिवसी रडताना आईला दिसली, यावर आईने तिला रडण्याचे कारण विचारले. मुलीने आईला सगळा प्रकार सांगितल्यावर आईच्या पायाखालची जमीन सरकली.

 

पोलिसांना महिलेने सांगितले की, मागील 1 वर्षांपासून मुलीवर तिच्या आरोपी बापाने अनेकवेळा बलात्कार केला. त्यासोबतच कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर महिलेने आपल्या मुलीसोबत थेट पोलिस स्टेशन गाठले आणि पतीविरूद्ध तक्रार दाखल केली.

 

क्राइम इंस्पेक्टर सुभाष चंद पांडेयने सांगितले की, बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आणि पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून मुलीला मेडिकल चेकअपसाठी पाठवले आहे. त्यासोबतच आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...