आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या जीवनावरील चित्रपटाचे प्रदर्शन रोखा, हायकोर्टात याचिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत चरित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सदर याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्रीय निवडणुक आयोगाला एक नोटीस जारी करत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही ऐन निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करत भाजप राजकीय फायदा मिळवू पाहत असल्याचा आरोप करत काँग्रेसनेही या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या चरित्रपटाचे प्रदर्शन येत्या ५ एप्रिल रोजी होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...