आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- अभिनेत्री आणि आताच काँग्रेसमध्ये प्रवेश करून उत्तर मुंबईच्या लोकसभेची उमेदवार उर्मिला मातोंडकरविरोधात भाजपकडून पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजपचे नेते सुरेश नखुआ यांनी उर्मिला मातोंडकरविरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार केली आहे. पण उर्मिलाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
उर्मिलाने एका टीव्ही कार्यक्रमात हिंदू धर्म हा जगातील सगळ्यात हिंसक धर्म असल्याचे म्हणाली होती. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याने भाजपकडून तक्रार दाखल केली गेली. या तक्रारीत सुरेश नखुआंनी राहुल गांधी आणि एका पत्रकाराचे नावही घेतले आहे.
चित्रपट सृष्टीत आपली कारकिर्द गाजवल्यानंतर उर्मिलाने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिला काँग्रेसकडून उत्तर मुंबईची लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. भाजपचे विद्यमान खासदार गोपाश शेट्टी यांच्याशी तिची लढत होणार आहे.
याच जागेवरून 2004 साली अभिनेता गोविंदानेही निवडणूक लढवून विजयी झाला होता. त्यामुळे आता परत याच जागेवर गोविंदाप्रमाणे उर्मिलाही आपली जादू दाखवू शकेल का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.