Home | Maharashtra | Pune | Case filed against wrestler for fraud in organising global meet

राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष आणि हिंद केसरीचे ट्रस्टीच्या संचालकाविरोधात फसवणुकीची तक्रार

दिव्यमराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 06:48 PM IST

शिवाजीनगरचे न्यायदंडाधिकारी आर.आर. भलगट यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

  • Case filed against wrestler for fraud in organising global meet

    पुणे- राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर लक्ष्मण टकले आणि हिंद केसरीचे ट्रस्टीचे संचालक योगेश दोडके यांच्यावर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. दोघांवर बनावट बिले सादर करून 50 लाख रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

    शिवाजीनगरचे न्यायदंडाधिकारी आर.आर. भलगट यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांना या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये टकले आणि दोडके या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

    > 2016 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महापौर कुस्ती स्पर्धेसाठी पुणे महापालिकेने एक कोटी 83 लाख 4 हजार 214 रुपये खर्च केले होते. त्यापैकी एक कोटी 26 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश पुणे महापालिकेने राष्ट्रीय तालीम संघाला देणगीच्या स्वरुपात दिला होता.

    टकले आणि दोडके यांनी बनावट बिले देऊन लाखो रुपयांची रक्कम लाटली. यासंबधी तालीम संघाच्या सदस्यांनी पुणे महापालिका आयुक्‍तांना लिखित तक्रार केली होती. तसेच कोर्टातही धाव घेतली होती.त्यानंतर कोर्टाच्या आदेशावरून दोघांविरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Trending