आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान यांच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पाकिस्तानातील हिंदू मुलींचे अपहरण व बळजबरीच्या धर्मांतराचे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबादहून “दिव्य मराठी’साठी शाह जमाल - पाकिस्तानचेे पंतप्रधान इम्रान खान आपल्या पहिल्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील १० खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिले की, अपहरण व बळजबरीच्या धर्मांतराच्या मुद्द्यावर इम्रान खान यांच्याशी थेट चर्चा करावी. यादरम्यान, सिंध राज्यात हिंदूूंसाठी धोकादायक ठरलेले अब्दुल खालिक मिथाने ‘दिव्य मराठी’शी केलेल्या चर्चेदरम्यान कबूल केले की, तो हिंदू मुलींंना बळजबरीने मुस्लिम करण्याच्या मोहिमेवर होता आणि यापुढेही राहील. एवढेच नव्हे, तर आपल्या पूर्वजांनी हेच काम केले होते, त्यामुळे त्याची नऊ मुलेही हेच काम करतील, असा दावा केला. दुसरीकडे, पाकिस्तानच्या मानवी हक्क आयोगाच्या अहवालात गेल्या वर्षी एकट्या सिंध प्रांतात अल्पसंख्याकांच्या धर्मांतराच्या एक हजाराहून अधिक प्रकरणांची नोंद झाल्याचे मान्य केले आहे. सिंध प्रांतात धर्मांतराचे सर्वात मोठे केंद्र धरकी शहरातील भरचुंदी दर्गा आहे. इम्रान खान यांचा निकटवर्तीय अब्दुल खालिक मिथा तो चालवतो. येथील सामाजिक कार्यकर्त्यानुसार, गेल्या नऊ वर्षांत ४५० हिंदू मुलींचे धर्मांतर या दर्ग्यात केले.


यासंदर्भात मिथाशी चर्चा केली तेव्हा तो म्हणाला, “होय, मी हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी दर्ग्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, मुलींना त्यांच्या घरून आणण्यासाठी कोणती टीम पाठवत नाही. त्या स्वत:च्या मर्जीने येतात. त्यामुळे त्यांच्या लग्नाची व्यवस्था करतो. माझ्या पूर्वजांनी हिंदूंचे धर्मांतर करून इस्लामची सेवा केली आहे. आज मी ही मोहीम पुढे नेत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी मुलेही हे काम करतील. मिथानुसार, भारतात घर परतीची मोहीम लवकर थंड पडली, कारण पाकिस्तानात कोणत्याही हिंदू मुलीवर बळजबरी केली जात नाही. घर परतीची मोहीम पाकिस्तान व इस्लामला कमी लेखण्यासाठी होती. पाकिस्तानात एकाही हिंदू मुलीवर दबाव टाकून बळजबरीने धर्मांतर केले गेले असेल तर भारत सर्वात आधी संयुक्त राष्ट्रात गेेला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. माझे घर, दर्गा व दरयाल अमन(सेफ हाऊस)मध्ये १७ पेक्षा जास्त हिंदू मुली आहेत. मात्र, मी त्यांचे धर्मांतर केले नाही. कारण, त्यांची तशी इच्छा नाही. मात्र, जे धर्मांतर करू इच्छितात त्यांना मी पूर्ण सुरक्षा देतो.’

 

७८ वर्षीय मौलवी मिथा इम्रान खान यांच्या निकटवर्तीयांपैकी एक, तो म्हणतो - मला आणखी एक बेगम हवी, तीही हिंदुस्थानी
७८ वर्षीय मिथा दशकांपासून धर्मांतर करत आहे. राजकीय वजन असल्यामुळे तो पंतप्रधान इम्रान खानचा निकटवर्तीय झाला. मिथा नऊ मुलांचा पिता आहे. त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे. तो आणखी एक लग्न करू इच्छितो. याबाबत तो म्हणतो की, मी आणखी एक निकाह करावा,अशी फॉलोअर्सची इच्छा आहे. ते वधूचा शोध घेत आहेत, मात्र नवी बेगम हिंदुस्थानी असावी ही इच्छा आहे.