आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूर, यूपी - जर तुमच्या घरात तान्हुले असतील, तर चुकूनही उंदीर पाळू नका! ही घटना सर्वांसाठी एक चेतावनीच आहे. गोविंदनगर परिसरात तान्ह्या बाळाला उंदिरांनी कुरतडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेत कुटुंबाने उंदीर पाळण्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला आहे.
- दादानगरमधील रहिवासी जितेंद्र कुमार वर्षभरापासून घरात 4 पांढरे उंदीर पाळत होते. हे उंदीर घरात खुले फिरत होते. घटनेच्या वेळी जितेंद्र ऑफिसात गेलेले होते, तर पत्नी गीता घरातील कामकाज करत होती. त्यांचा एका महिन्याचा मुलगा निहाल बेडवर झोपलेला होता. तेवढ्यात चारही उंदरांनी त्याच्यावर हल्ला चढवला.
- बाळ रडत असल्याचा आवाज आल्यावर आईला वाटले बाळाला भूकच लागली असेल. ती त्याला दूध पाजण्यासाठी गेली असता बाळाला उंदीर कुरतडत असल्याचे दिसून आले. उंदरांनी बाळाच्या गाल, हात-पाय, नाक-कान सर्व जागांवर कुरतडले होते.
- बाळाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, ज्या घरात लहान बाळ असतील तेथे उंदीर अजिबात बाळू नयेत.
पुढच्या सलाइडवर पाहा, या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.