Home | Maharashtra | Vidarva | Akola | case registered against 3 people in akola

मुंजाचा बळी देण्याच्या प्रयत्नात शिक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल, पैशाचा पाऊस पाडण्याचे प्रकरण

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 07:50 AM IST

कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पाडण्यासाठी २५ ते ३० वयोगटातील मुंज्याच्या (अविवाहित) शोधात असणाऱ्या शिक्षकाविरुद्ध खदान

  • case registered against 3 people in akola
    अकोला - कोट्यवधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पाडण्यासाठी २५ ते ३० वयोगटातील मुंज्याच्या (अविवाहित) शोधात असणाऱ्या शिक्षकाविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. सुधाकर राजाराम सोळंके (रा. खडकी) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सुधाकर सोळंके हा एका विद्यालयात शिक्षक आहे. बुधवारी सुधाकर सोळंके याने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असलेल्या रोशन भटकर यांच्या मोबाइलवर फोन केला. आपल्याला पंचवीस-तीस वयोगटातील अविवाहित युवक पाहिजे, असे म्हणाला. आपण त्याला वाशीम जिल्ह्यातील धनजच्या मांत्रिकाकडे घेऊन जाऊ. त्याबदल्यात तुला एक कोटी, मला एक कोटी मिळू शकतात. त्या अविवाहित यूवकाला सुद्धा ५० लाख देऊ, असे मोबाइल फोनवरून सांगितले. ही बाब रोशन भटकरने अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक पुरुषोत्तम आवारे यांना सांगितल्यानंतर ते खदान ठाण्यात आले. पोलिसांना शिक्षक सुधाकर सोळंकेने मोबाइलवरून केलेले संभाषण ऐकवले. नरबळी देण्याचा हा प्रयत्न असल्याने पोलिसांनी शिक्षक सुधाकर सोळंकेला खडकी येथील त्याच्या घरून ताब्यात घेऊन पुरुषोत्तम आवारे यांच्या तक्रारीवरून त्याच्यासह तीन साथीदारांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायदा ३, १, २ नुसार गुन्हा दाखल केला.

Trending