आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार राम कदमांना वक्‍तव्‍य भोवणार, घाटकोपरनंतर बार्शीमध्‍येही गुन्‍हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महिलांविषयीचे आक्षेपार्ह वक्‍तव्‍य राम कदम यांना चांगलेच भोवणार असल्‍याचे दिसत आहे. कारण घाटकोपरनंतर बार्शीमध्‍येही त्‍यांच्‍याविरोधात अदखलपात्र गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍यांच्‍याविरोधात हा गुन्‍हा नोंदविल्‍याची माहिती आहे. कलम 404 व 505 बी अंतर्गत त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

गुन्‍हा अदखलपात्र असल्‍यामुळे तुर्तास पोलिस त्‍यांना अटक करण्‍याची शक्‍यता नाही. मात्र हे प्रकरण कोर्टात गेल्‍यास कोर्ट याप्रकरणी काय भुमिका घेणार, हे पाहणे महत्‍त्‍वाचे ठरणार आहे. तसेच राम कदमांविरोधात राज्‍यात ठिकठिकाणी पोलिसांत तक्रार दिली जाईल, असे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सांगण्‍यात आले आहे.  

 

कारवाई जमत नसेल तर राजीनामा द्या, सुप्रिया सुळेंनी मुख्‍यमंत्र्यांना सुनावले  
पुण्‍यातीन इंदापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना राष्‍ट्रवादीच्‍या खासदार सुप्रिया सुळे यांनी राम कदम यांच्‍या वक्‍तव्‍यावरून मुख्‍यमंत्र्यांवर टीका केली. 'राम कदमांवर कारवाई करणे जमत नसेल तर राजीनामा द्या. कदमांचे काय करायचे ते आम्‍ही बघून घेऊ', अशा शब्‍दात त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांना सुनावले. तसेच मुलींची सुरक्षितता ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्‍यांची सुरक्षितता हाच आपला धर्म आणि कर्म आहे, असे म्‍हणत त्‍यांनी राम कदमांच्‍या वक्‍तव्‍याचा खरपूस समाचार घेतला. घाटकोपरमध्‍ये दहीहंडी उत्‍सवादरम्‍यान राम कदम यांनी 'तुम्‍हाला एखादी मुलगी पसंत असेल तर मला कळवा. तिला पळवून आणतो.', असे वक्‍तव्‍य केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...