आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Surat News: Case Registered Against Father For Molesting, Repe And Physical Abuse Of 2 Minor Daughters

बंद खोलीत मुलीला जेवू घालताना अचानक बदलले बापाचे वागणे, किंकाळी ऐकून मोठ्या बहिणीला आला संशय, मायलेकीने दार उघडेपर्यंत फाटले होते लहान मुलीचे कपडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - शहरात एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. एका वासनांध बापावर पोटच्याच दोन मुलींवर रेप आणि छेडछाड केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना पांडेसरामधील विनायक नगरची आहे. येथे आई आपल्या दोन्ही मुलींना घेऊन पोलिसांत गेली आणि पतीवर आरोप केला की, तो दोन्ही अल्पवयीन मुलींची छेड काढतो.

 

बापच करायचा पोटच्या मुलींची छेडछाड
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. बाप दोन्ही मुलींची नेहमी छेडछाड करत असल्याचा आरोप आहे. गुरुवारी जेव्हा घरी कोणीही नव्हते तेव्हा त्याने छोटी मुलगी जिचे वय 11 वर्षे आहे, तिची छेड काढली. यादरम्यान मोठी मुलगी आल्यावर त्याला संशय आला आणि त्याने हळूच आईलाही बोलावले. दार उघडून आईने पाहिले तर आत छोट्या मुलीचे कपडे फाटलेले होते. पत्नी आणि मुलीला पाहून आरोपी बाप पळू लागला, पण त्यांनी त्याला पकडून ठेवले. यानंतर आईने दोन्ही मुलींसोबत पांडेसरा पोलिस चौकी गाठली. तेथे आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दोन्ही मुली म्हणाल्या- वडील एवढे क्रूर आहेत की, यापूर्वीही त्यांनी तिच्यावर रेप करण्याचा प्रयत्न केला होता. पत्नीने आरोप केला आहे की, पतीला तिने अनेकदा असे न करण्याची समज दिली होती, तरीही तो सुधारला नाही. 

 

अशी वाचली: मोठ्या बहिणीने आधी पाहिले बापाचे पाप
आरोपीला 2 मुली आहेत, ज्यात एकीचे वय 13 वर्षे आणि दुसरीचे वय 11 वर्षे आहे. आरोपी बाप दरवेळी वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही मुलींची छेड काढायचा. आरोपीने काही दिवसांपूर्वीच आपल्या मोठ्या मुलीवर रेप करण्याचा प्रयत्न केला होता, यामुळे दोन्ही मुलींना आई एकटी सोडत नव्हती, परंतु बुधवारी आरोपीने संधी साधून छोट्या मुलीला रूममध्ये बंद केले आणि तिचे कपडे फाडून रेप करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच वेळी मोठी मुलगी काही कामानिमित्त घरी आली आणि तिने दार उघडण्यासाठी आवाज दिला. परंतु आरोपीने दार उघडले नाही, आतून बहिणीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. यामुळे तिला संशय आला की, बाप छोट्या बहिणीसोबत कुकृत्य करत आहे. यानंतर तिने आईला आवाज दिला. आई धावतच तिसऱ्या मजल्यावर गेली, तेथे बंद खोलीत आरोपी मुलीचे कपडे फाडलेले होते. यानंतर आईने मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले.

 

पत्नी : याच भीतीमुळे मी नोकरी सोडली...
महिलेने सांगितले की, तिच्या वडिलांना वाईट सवय आहे. मी अनेकदा समजावले की, मुलींसोबत असे करू नकोस, परंतु तो ऐकला नाही. अनेकदा त्याने मुलींना विकण्याचाही प्रयत्न केला, तो मुलींना मुंबईला नेण्याचे सांगायचा. मी स्वत: नोकरी करायचे आणि घर चालवायचे, पण घरी एकट्या राहणाऱ्या मुलींसाठी मला काळजी वाटायची. कारण मुली बापाचे सर्व कृत्य सांगायच्या. माझ्या मुलींसोबत काही अनर्थ होऊ नये, याच भीतीमुळे मी नोकरी सोडली. बुधवारी जेव्हा त्याने मुलीसोबत पाशवीपणा केला, तेव्हा मला सहन झाले नाही. 

 

मोठ्या मुलीची आपबीती: 
पप्पा, दररोज मला एकटी गाठून इथेतिथे स्पर्श करतात. यामुळे मी मम्मीला सांगितले. तिनेही पप्पांना समजूत घातली. यावरून दोघांमध्ये मोठा वाद सुरू व्हायचा. मग पप्पा चिडून अनेकदा मम्मीला आणि मलाही मारायचे. विरोध केल्यावर पप्पा म्हणायचे की, तुला खाली फेकून देईन, यामुळे त्यांच्याशी बोलण्याचीही भीती वाटायची.


छोट्या मुलीची आपबीती: 
बुधवारी मी एकटीच घरी होते. पप्पांनी दार बंद करून मला खाऊ घालायला सुरुवात केली. मग अचानक त्यांचे वागणे बदलले आणि ते माझे कपडे फाडू लागले. मी ओरडल्यावर त्यांनी माझे सर्व कपडे फाडले. तेवढ्यात मम्मीने दार उघडले तेव्हा पप्पांनी आईसोबत भांडण सुरू केले. मग पोलिस आले आणि पप्पांना घेऊन गेले.

 

काय म्हणाले पोलिस?

महिला म्हणाली की, मुलीवर रेप केला आहे. याशिवाय बापाने मुलींसोबत अनेक आक्षेपार्ह कृत्ये केलेली आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे, परंतु अद्याप त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही.
- एम. आय. पठाण, इंचार्ज, पांडेसरा पोलिस स्टेशन. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...