Home | Business | Business Special | Cash crunch situation due to lack of ATM

देशात बनत आहे नोटबंदी सारखी परिस्थिती, सरकार झाली सतर्क, RBI ला दिला सल्ला...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 07, 2019, 01:05 AM IST

एटीएम आणि नवीन नोटांच्या कमतरेतेमुळे घेण्यात आली बैठक.

 • Cash crunch situation due to lack of ATM

  नवी दिल्ली- देशात रोख पैशांच्या कमतरतेमुळ परत नोटबंदीसारखी परिस्थिती तयार होऊ नये, यासाठी संसदेतील पॅनलने रिझर्व बँक ऑफ इंडियाला सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. संसदीय पॅनलने म्हटले की, देशात मोठ्या प्रमाणात एटीएम बंद होत आहेत, आणि जे चालु आहेत त्यात मोठ्या प्रमाणावर कॅशची कमतरता आहे. अर्थिक प्रकरणाच्या स्टँडिंग कमेटीनेही बँकांना एटीएमची संख्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पॅनेलने मागच्या आठवड्यात रिपोर्ट सादर केली आहे.

  नवीन एटीएम बसवण्याचे आदेश
  आरबीआयच्या डेटानुसार सप्टेंबर 2018 पर्यंत देशात एकुण 2.21 लाख एटीएम होते. यात पब्लिक सेक्टर बँकांचे 1.43 लाख, प्रायवेट बँकांचे 59 हजार आणि फॉरेंन बँकांचे 18 हजार एटीएम सामील आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, देशात डिजिटल ट्रांझॅक्शनला चालना दिली जात आहे. पण ते तोपर्यंत शक्य होणार नाही जोपर्यंत एटीएमची संख्या वाढवली जाणार नाही. अशातच आरबीआयला याप्रकारच्या परिस्थीतीशी सामना करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना पैशाची कमतरता भासणार नाही.


  देशात आत्ताही एटीएमची संख्या कमी आहे
  कांग्रेस नेते वीरप्पा मोइली यांच्या अध्यक्षेत बनलेल्या संसदीय पॅनेलने आरबीआयला एक सल्ला देताना म्हटले की, देशात कॅशची कमतरता होऊ नये यासाठी आरबीआयने लवकरच पाऊल उचलले पाहिजे. कमेटीने सांगितले की, देशात आता जितके एटीएम आहेत ते खुप कमी आहेत. त्यामुळे देशातील वाढती अर्थव्यवस्था पाहता एटीएमची संख्या वाढवली पाहिजे. त्यासोबतच जन-धन आणि डिजिटल ट्रांझॅक्शन रिफॉर्मच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात डेबीट कार्ड जारी केले गेलेले आहेत, पण नवीन एटीएम लावण्यात आलेले नाहीत. एटीएमने फक्त कॅशच काढले जात नाही तर इतरही बँकेच्या सेवा केल्या जातात.


  2000 च्या नोटांची छपाई थांबल्याची होती बातमी
  काही दिवसांपूर्वी 2000 रूपयांच्या नोटांची छपाई थांबल्याची बातमी पसरली होती, त्यामागे कारण देण्यात आले होते की, सध्या चलनात त्या नोटा भरपूर प्रमाणात आहेत. 2016 मध्ये नोटबंदीनंतर ही नोट जारी करण्यात आली होती. आर्थिक प्रकरणाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले की, जेवढी गरज आहे तेवढी छपाई केली जाते. सरकारने मागच्या शुक्रवारी 2000 हजारच्या नोटांचे प्रमाण मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्यांचीच छपाई बंद केली आहे.


  मार्चपर्यंत बंद होतील सगळे एटीएम
  कंफेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (CATMI) कडून मागच्या वर्षी दावा करण्यात आला होता की, मार्च 2019 पर्यंत देशातील 50 टकेके एटीएम बंद होतील. CATMI नुसार देशात आता 2.38 लाख एटीएम आहेत त्यापैकी 1.13 लाख एटीएम बंद होण्याचा मार्गावर आहेत. जर देशात इतक्या मोठ्याप्रमाणावर एटीएम बंद झाले तर नागरिकांना खुप त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यासोबतच लाखो लोकांचे रोजगार संपून जातील.

Trending