आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा धुमाकुळ : फुलंब्री आणि वैजापूर तालुक्यात घरफोडी, १ लाखासह पावणेतीन लाख रुपयांचे दागिने पळवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री  - तालुक्यातील वारेगावात व शेतवस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घालून एक लाख रुपयांच्या रोख रकमेसह पावणेतीन तोळ्यांचे दागिने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पळवले.   बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. चोरट्याला शोधण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र, घराच्या परिसरातील दोन किमी अंतरावर जाऊन श्वान घुटमळल्याने त्याला माग काढता आला नाही. याबाबत कडुबा कुशाबा मोरे यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वारेगावपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील शेतवस्तीवर राहणारे शेतकरी कडुबा कुशाबा मोरे यांच्या घराचे चॅनल गेट उघडून चोरट्यांनी मंगळवारी  मध्यरात्री घरात प्रवेश केला. कपाटात असलेले रोख एक लाख रुपये अाणि किचन रूममध्ये असलेल्या दोन लोखंडी पेट्या उचलून सुमारे पाचशे ते सहाशे फुटावर असलेल्या शेततळ्याच्या बाजूला नेऊन पेटीचा कडीकाेयंडा तोडून त्यात असलेले पावणेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.  रोख एक लाख रुपयांसह ७९४०० रुपयांचे दागिने लंपास केले. उर्वरित इतर साहित्य अस्ताव्यस्त पडून होते. 

 

वैजापूर - डोंगरथडी भागातील खरज येथे बांधकाम व्यावसायिकांच्या घरातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सहा तोळे सोने व रोख ६० हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. निंबाराज प्रल्हाद भवरे (५४, रा.खरज, ता. वैजापूर) हे बांधकाम ठेकेदार असल्यामुळे त्यांनी  बुधवारी लोणी येथे आठवडी बाजार असल्याने मजुराचे पगार वाटप करण्यासाठी मंगळवारी रक्कम घरी आणली होती. रात्री जेवण करून घराच्या गच्चीवर झोपले असता मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला व घरात ठेवलेले साठ हजार रुपये रोख व सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले. चोरी झाल्याचे सकाळी लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. शिऊर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी हजर होऊन औरंगाबादहून श्वानपथक तसेच ठसे एक्स्पर्ट यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे चक्र फिरवले.  

 

 

बातम्या आणखी आहेत...