आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- काॅसमाॅस बँकेचे पेमेंट सर्व्हर हॅक करून सुमारे ९४ काेटी ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात अाली अाहे. यासाठी २८ देशांतील १२ हजार व्यवहार प्रत्यक्ष एटीएम केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. भारतात करण्यात अालेल्या २५०० व्यवहारांत रक्कम काढण्यासाठी काेल्हापूर, पुणे, मुंब, हैदराबाद, इंदूरसह देशभरातील महत्त्वपूर्ण शहरातील एटीएमचा वापर करण्यात अाल्याचे तपासात समाेर अाले अाहे. याप्रकरणी संबंधित एटीएम केंद्रांतील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत.
सायबर क्राइम सेलच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी काॅसमाॅस बँकेच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली अाहेच. गुन्ह्यावेळी नेमकी काेणत्या ठिकाणावरून अाणि कोणत्या वेळी व्यवहार झाले याची बँकेकडे सविस्तर माहिती उपलब्ध असून त्याअाधारे पाेलिस अाराेपींचा माग काढण्यासंदर्भात चाचपणी करत अाहेत. दरम्यान, पुण्यातील चांदणी चाैक, नरपीतनगर चाैक या ठिकाणच्या एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित घटनेच्या दिवशी पैसे काढताना दिसून अाले आहेत. त्यादृष्टीने संशयितांची माहिती काढण्याचे काम पथक करत अाहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाेलिसांनी खासगी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली असून बँकेनेही सर्व्हर नेमके कशा प्रकारे हॅक झाले याबाबत तपासासाठी विदेशी न्यायवैद्यक यंत्रणेस पाचारण केले अाहे.
साेमवारपासून बँकेचे एटीएम सुरू होणार
काॅसमाॅस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यानंतर बँकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने बँकेचे एटीएम, डेबिट कार्ड सेवा, माेबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा हे व्यवहार बंद ठेवले अाहेत. नवीन पेमेंट सर्व्हरची यशस्वी चाचपणी झाल्यावर संबंधित सुविधा सुरू करण्यात येतील, असे बँकेने सांगितले हाेते. त्यानुसार साेमवारपासून सदर सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांनी अापल्या खात्यातून व्यवहार झालेत का याची तपासणी करण्याकरिता बँकेच्या विविध शाखेत गर्दी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.