Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Caste politics happening in Maharshtra

निवडणुकीत जातीपातीचं राजकारण होतेय हे दुर्दैव, मला ते मान्यच नाही

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 10:33 AM IST

परळी येथील पत्रकार परिषदेत खासदार छत्रपती संभाजीराजे यांची खंत

  • Caste politics happening in Maharshtra

    परळी- अठरा पगड जातिधर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना एकत्रित करून न्याय मिळवून दिला. तोच आदर्श माझ्या डोळ्यांसमोर आहे. राजकारणात मला जातपात मान्य नसून लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात हे घडतं हे दुर्देव आहे, अशी खंत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी परळीत पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.


    महायुतीच्या उमेदवार खा.डॉ. प्रीतम मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे मंगळवारी परळीत आले होते. त्यांनी परळीत यशश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी मी राज्यात ज्या वेळी शिवशाहू दौरा काढला त्यावेळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी माझ्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. भगवानगडावरही मला बोलावले होते. राजकारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन केले पाहिजे. निवडणुकीत जातीपातीचं राजकारण होत आहे हे दुर्दैव असून जिल्ह्याच्या राजकारणात असे घडायला नको आहे. मुंडे साहेबांच्या निधनाअगोदर माझी त्यांची भेट झाली होती. रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला ते येणारही होते. पुण्यात भेट झाली तेव्हा त्यांनी माझ्या मुलीकडे लक्ष ठेवा, असे सांगितलेले होते. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. पण भाजपचा सहयोगी सदस्य आहे. माझे समर्थन भाजपला आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.

    ओबीसीत आरक्षण शक्य नाही
    सरकारने मराठा आरक्षण दिले आहे. काही त्रुटी भरून काढण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू असून कायद्याच्या चौकटीत मजबुती यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. मराठा आरक्षण ओबीसीत भरून काढणे शक्य नाही, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Trending