आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Casting Director Sent Jail For Lifetime In Case Of Sexual Harassing A Model In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉडेलवर बलात्कार करून तिच्या पतीला पाठविले होते अश्लील फोटो, कास्टिंग डायरेक्टरला जन्मठेप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीत कास्टिंग काउच (कामाच आमिष दाखवून लैंगिक शोषण करणे) चा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशाच एका खटल्यात मुंबईतील एका सेशन कोर्टाने कास्टिंग डायरेक्टरला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, रवींद्रनाथ घोष असे शिक्षा झालेल्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे. रवींद्रनाथ घोष याने 23 वर्षीय अभिनेत्री आणि मॉडेलव बलात्कार केला होता. एवढेच नाही तर पीडित मॉडेलच्या पतीला पत्नीचे अश्लील फोटो पाठविले होते. दोषी सध्या तुरंगाची हवा खात आहे. कोर्टाने त्याला 1 लाख 31 हजार रुपये दंडही सुनावला आहे. त्यापैकी एक लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित मॉडेलला देण्यात येणार आहे.

 

काय आहे हे प्रकरण..? हॉस्पिटलमध्ये काम करत होती पीडिता..
हे प्रकरण 2011 मधील आहे. पीडिता एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिथे आरोपीची भेट झाली होती. आरोपीने पीडितेला सांगितले होते की, तो कॅमेरामन आणि कास्टिंग डायरेक्टर आहे. तसेच तो एक टेलिव्हिजन सीरीजचे प्रोडक्शन करत आहे. यासाठी त्याला एका महिला मॉडेलची आवश्यकता आहे. पी‍डितेने सीरीजमध्ये काम करण्यास रुची दर्शवली. घोष याने एका महिन्यात पीडितेला टीव्ही शोच्या ऑडिशनसाठी पाठवले. मात्र, त्या बदलल्यात शरीर सुखाची मागण केली.

 

आधी बलात्कार केला नंतर अश्लिल फोटो घेतले...
शरीर सुखाची मागणी पूर्ण करण्यास पीडितेने आरोपीला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, आरोपीने दोन आठवड्यानंतर पीडितेला फोन केला. महिेलेला टेलिव्हिजन सीरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. शूटिंगसाठी मड आयलंडवर जायचे असल्याचे सांगून बोलावून घेतले. मड आयलंड येथे नेऊन एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्याने पीडितेचे अश्लिल फोटो काढले. नंतर अश्लिल फोटोवरून तिला ब्लॅकमेल करून तिच्याव मार्च 2012 पर्यंत वारंवार बलात्कार केला.

 

पिछा सोडण्यासाठी मागितल एक लाख रुपये..
पीडितेने आरोपी घोषच्या लैंगिक छळाला कंटाळून नोकरी बदलली. परंतु आरोपीचा त्रास कमी झाला नाही. अखेर पीडिता सापूतारा येथे पतीकडे राहाण्यास गेली. नंतर डिसेंबर 2012 मध्ये परत मुंबईला आली. तेव्हा ती गरोदर होती. आरोपीने पुन्हा तिची भेट घेतली. पिछा सोडण्यासाठी तिला एक लाख रुपयाची मागणी केली. डिलिव्हरी झाल्यानंतर पैसे देते असे पीडितेने सांगून वेळ मारून नेली आणि 2013 मध्ये तिने मोबाइल क्रमांक बदलला.

 

पती आणि बॉसला पाठविले अश्लिल फोटो..
डिसेंबर 2013 मध्ये पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रवींद्रनाथ घोष याला पोलिसांनी अटक केली. अटकेत असताना आरोपीने पीडितेचा पती आणि बॉसला अश्लिल फोटो पाठविले. हे फोटो पाहिल्यानंतर पीडिलेच्या पतीने तिला आणि नवजात बाळाला सोडून दिले.