• Home
  • Business
  • Catalogs feature to be added in WhatsApp Business App for small traders,

नवीन फीचर / व्हॉट्सअप बिझनेस अॅपमध्ये आले कॅटलॉग फीचर; याचा व्यापारी आणि ग्राहकांना होणार असा फायदा

भारतात देखील मिळणार कॅटलॉग्स फीचर सुविधा
 

Nov 08,2019 02:37:00 PM IST


गॅजेट डेस्क - व्हॉट्सअपने लहान व्यापारांसाठी आपल्या बिझनेस अॅपमध्ये कॅटलॉग्स फीचर जोडले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की कॅटलॉग्स फीचर मोबाइल स्टोअरप्रमाणे काम करेल. यामध्ये व्यापारी प्रॉडक्टची माहिती पाहू आणि शेअर करू शकतील. याद्वारे ग्राहक आपल्या सुविधेनुसार प्रॉडक्ट शोधून त्याविषयीची माहिती मिळवू शकतील.


भारतात देखील मिळणार कॅटलॉग्स फीचर सुविधा

कंपनीचे म्हणणे आहे की, यापूर्वी व्हॉट्सअपमध्ये प्रत्येक उत्पादनाचे वेगवेगळे फोटो शेअर करावे लागत होते. आणि ग्राहकांना सतत उत्पादनाविषयी माहिती द्यावी लागत होती. मात्र कॅटलॉग्स फीचर आल्यानंतर ग्राहक व्हॉट्सअप बिझनेस अॅपमध्ये पूर्ण कॅटलॉग पाहू शकतील, यामध्ये त्यांना उत्पादनाविषयी सर्व माहिती मिळेल.


कॅटलॉग फीचर व्यापाराला अधिक व्यावसायिक बनवेल. तर ग्राहकांना वेबसाइटवर न जाता चॅटवरच सर्व माहिती मिळणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

व्यापारांना या कॅटलॉगमध्ये उत्पादनाचा कोड, फोटो, किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर सारखी आवश्यक माहिती जोडता येणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, याद्वारे व्यापारी आणि ग्राहक दोघांच्याही फोनचे स्टोरेज वाचण्यास मदत होईल.


सध्या कॅटलॉग फीचरची सुविधा भारतासह ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, मॅक्सिको, युके आणि युएस सारख्या देशांत मिळेल. ही सुविधा इतर देशांमध्ये लवकरच सुरु करण्यात येईल. हे फीचर अँड्राइड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या डिव्हाइस वर काम करेन.


X