Home | Khabrein Jara Hat Ke | Catherine Luis creates binocular to take picture of black hole

सहा वर्षांपूर्वी कृष्ण विवराबद्दल नीटपणे ऐकलेसुद्धा नव्हते... पण कृष्ण विवराचे पहिले छायाचित्र काढण्यासाठी तिने बनवलेली एलगोरिद्म कामी आली

दिव्य मराठी | Update - Apr 13, 2019, 11:25 AM IST

कॅथरीन लुइस (केटी) बोमन, असिस्टंट प्रोफेसर, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

 • Catherine Luis creates binocular to take picture of black hole

  जन्म- १९९० (इंडियाना, अमेरिका)
  शिक्षण- इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग (युनिव्हर्सिटी ऑफ मिशीगन), मास्टर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), पीएचडी इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स (एमआईटी)

  चर्चेत का- कृष्ण विवराचे पहिले छायाचित्र काढण्यासाठी तिने बनवलेली एलगोरिद्म कामी आली.

  वर्ष २०१३. केटी बोमनसाठी एखादा सर्वसामान्य रिसर्च स्कॉलरसारखेच होते. ती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजीतून कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून ती पीएचडी करत होती. तेव्हाच केटीला इव्हेंट हॉराइझॉन टेलिस्कोप टीमचा भाग बनण्याची संधी मिळाली. केटीला निवडण्यामागे कारण काय होते? अदृश्य गोष्टी पाहणे वा त्यांचे छायाचित्र काढण्यात तिला आवड होती. मात्र त्यावेळी केटीला काहीच माहीत नव्हते. प्रोजेक्टची कल्पना नव्हती. ज्या कृष्णविवराचे छायाचित्र तिच्या टीमला घ्यायचे होते, ते नेमके आहे तरी काय, हेही तिला माहीत नव्हते. २०० शास्त्रज्ञांची ही टीम होती. निवडक महिलांपैकी केटी एक. आश्चर्य म्हणजे तिच्याकडे खगोलशास्त्राचा काही विशेष अनुभव नव्हता. केटी आणि तिच्या टीमचे काम होते, ते एल्गोरिद्म बनवणे, जे हजारो जीबी डाटा एकत्र करू शकत होते. कृष्णविवराचे छायाचित्र कसे घेता येईल, हे केटीने २०१७ मध्ये एका टेड टॉकमध्ये सांगितले होते. मात्र त्यावेळी तिला हे माहीत नव्हते की, दोन वर्षाच्या आतच तिची टीम हा भीमपराक्रम करून दाखवेल.


  केटीचे वडील चार्ल्स बोमन पर्डू युनिव्हर्सिटीत बायोमेडीकल-इलेक्ट्रीकल-कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत. चार्ल्स स्वत: मेडिकल-मटेरिअल इमेजिंगवरही काम करतात. त्यांना पाहूनच केटीला यात आवड निर्माण झाली. चार्ल्स यांच्या मते केटी इंडियानात ज्युनियर हायस्कूलपासूनच इमेज सेन्सिंगवर काम करत होती. केटीने यापूर्वी सामान्य व्हिडिओत अनेक अदृश्य वस्तू, ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्यांचेही परीक्षण केले होते.

Trending