आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाच्या भीतीने चिमुरड्याचे झाले असे हाल, घरीच असूनही आईवडिलांना काहीच कळले नाही, सीसीटीव्हीमध्ये झाला शॉकिंग खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीगड - जर तुमचा मुलगाही ट्यूशनला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा सतर्क करणारा आणि हैरान करणारा व्हिडिओ एका घरातील सीसीटीव्ही फुटेज आहे. यात एक शिक्षक मुलाला मारहाण करताना दिसतोय. ही घटना अलीगडच्या टीकाराम कॉलनीतील आहे. या निर्दयी शिक्षकाने मुलाला चपलेने मारहाण केली, केस पकडून खेचले. एवढ्यानेही त्याचे मन भरले नाही म्हणून त्याचे बोटही तोडले. फक्त 7 वर्षांच्या चिमुरड्याला एवढे टॉर्चर केले. त्याला आपले काम पूर्ण करता येत नाही, एवढीच त्याची चूक होती. मुलाला रोज मारहाण करून शिक्षक त्याला धमकीसुद्धा द्यायचा. शिक्षकाच्या दहशतीमुळे तो एवढा भ्यायला की, अनेकदा विचारूनही वडिलांना काहीही सांगायला तयार नव्हता.

 

सीसीटीव्ही कॅमऱ्यातून झाला खुलासा, आईवडिलांना बसला धक्का
- मुलाच्या वडिलांना या घटनेची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळाली. मुलाच्या राहत्या घरात काही कारागीर काम करत होते. वडिलांना जेव्हा त्यांचे रेकॉर्ड पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा मुलाच्या मारहाणीचा व्हिडिओ पाहून दंग झाले. दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलासोबत शिक्षकाचे कृत्य पाहून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला खूप निर्दयीपणे मारहाण केली जात होती. आईवडिलांनी ज्या मुलाला हातही लावला नव्हता, त्याला अशी मारहाण पाहून त्यांना धक्काच बसला. 

 

परिचित होता शिक्षक
- शिक्षकाचे नाव कमल असून तो पीडित मुलाच्या कुटुंबीयांचा परिचयाचा आहे. आईवडिलांनी मुलाला शिकवणीसाठी भरवशाचा म्हणून ज्याच्याकडे क्लास लावला, त्यानेच एवढी मारहाण केली.

 

 

बातम्या आणखी आहेत...