आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुपारच्या जेवणानंतर सुस्ती येण्याची कारणे आणि उपाय 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुपारचे जेवण झाले की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा अनुभव तुम्हीही अनेकदा घेतला असेल. खासकरून सणावाराच्या दिवशी गोडधोड खाल्ल्यानंतर किंवा जड जेवण झाल्यानंतर तर असा अनुभव जास्त येतो. यासाठी भोजनानंतर वामकुक्षी घ्यावी म्हणजे डाव्या कुशीवर झोपावे असे म्हटले जात होते. 


१. काही लोकांना तर दुपारचे जेवण केल्यानंतर छान झोप घेण्याची सवय असते. त्यांना ती झोप मानवतेही; पण नोकरी करणाऱ्या, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हे कदापि शक्य नसते. अगदी सुटीच्या दिवशीही त्यांच्यामागे आठवडाभराची साठलेली घरची कामे करण्याचे टेन्शन असते. दुपारचे जेवण केल्यावर झोप येऊ लागते आणि सोबतच आळसही येतो. दुपारच्या जेवणाआधीची आणि दुपारच्या जेवणानंतरची आपली सक्रियता यातही फरक दिसतो, पण असे का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केला का? 


. दुपारचे जेवण केल्यावर झोप येण्याचे कारण पचनक्रियेशी संबंधित आहे. जेवण केल्यानंतर आपल्या शरीरात पचनक्रिया सुरू होते तेव्हा पचन संस्थांना अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंझाइमचा स्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते. अशा स्थितीत रक्तप्रवाह पचनसंस्थांकडे अधिक वळवला जातो. परिणामी या वेळी मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. मेंदूमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याने मेंदू कमी क्रियाशील होतो. त्यामुळे थकवा आणि आळस येतो आणि झोपही येऊ लागते. 


. सकाळी जास्त क्रियाशील असतो मेंदू : जर झोपेचा संबंध हा पचन तंत्राशी आहे, तर स्वाभाविकपणे असाही प्रश्न उभा राहतो की, नाष्टा केल्यावर झोप का येत नाही? खरं तर नाष्टा ज्या वेळी केला जातो. त्या वेळी आपला मेंदू फार क्रियाशील असतो. मेंदू एका मोठ्या झोपेनंतर आणि आरामानंतर सक्रिय झालेला असतो, पण दुपारच्या जेवणापर्यंत मेंदूची ऊर्जा आधीच्या तुलनेत अधिक खर्च झालेली असते. अशा वेळी ऑक्सिजन कमी झाल्याने मेंदू काम करण्यासाठी लगेच तयार होऊ शकत नाही. 


४. जर तुम्ही नोकरी करता, ऑफिसमध्ये काम करता आणि दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला झोप येण्याची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी एक मार्ग आहे. दुपारच्या जेवणात कमीत कमी कॅलरी असाव्यात असा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे हलका आहार घ्या. जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्याने जास्त झोप येते. तळलेले पदार्थ आणि जड अन्न पचवण्याला पचनसंस्थेला अधिक काम करावे लागते. त्यामुळे दुपारच्या जेवणात तळलेले पदार्थ आणि पचायला जड पदार्थ यांचा समावेश करणे टाळा.

बातम्या आणखी आहेत...