आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या वयासह केसांचे पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, जेव्हा केसांचे वय हे तुमच्या वयापेक्षा जास्त दिसू लागते तेव्हा तो चिंतेचा विषय होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या केसांचा काळा रंग हा मेलानिन नामक पिगमेंटमुळे असतो. हे पिगमेंट केसांच्या मुळाशी असतात. जेव्हा मेलानिन बनणे बंद होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. वेळेआधीच केस पांढरे होण्याची खूप कारणे आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची कारणे आम्ही सांगत आहोत...

1. वेळेपूर्वी केस पांढरे होण्याचे एक कारण अनुवंशिकता आहे. तुमच्या आई अथवा वडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील तर तुमचेही केस लवकर पांढरे होतात.

2. शरीरामध्ये प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन बी १२ अशा पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास, केस पांढरे होऊ लागतात.

3. प्रमाणापेक्षा जास्त तणाव घेतल्यास किंवा तणावपूर्ण वातावरणात काम केल्यास, केस लवकर पांढरे होतात.

4. नशिले पदार्थ, अल्कोहल, धूम्रपान इत्यादी जास्त घेतल्यामुळेही केस पांढरे होतात. यापासून दूर राहणेच जास्त चांगले.

5. डिप्रेशन, झोपेच्या गोळ्या वा गरजेपेक्षा जास्त अँटिबायोटिक औषध घेतल्यामुळेही केस पांढरे होतात.

6. कमी वयात मधुमेह वा थायरॉइ़डसारखे आजार झाल्यास, केस पांढरे होण्याचे कारण ठरते.

7. वाढते प्रदूषण आणि धूळ - मातीच्या सतत संपर्कात आल्यामुळेही केसांचा काळेपणा निघून जातो आणि केस पांढरे होतात.

8. केसांमध्ये विविध केमिकलयुक्त क्रीम लावल्यास किंवा हेअर कलर केल्यामुळेही केस पांढरे होतात. त्याशिवाय स्ट्रेटनिंग आणि कर्लिंग मशीनचा जास्त उपयोग केल्यास, केसांना नुकसान पोचते आणि केस पांढरे होऊ लागतात.

बातम्या आणखी आहेत...