आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताणामुळे केस पांढरे होतात का? जाणून घ्या यामागील सत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोक्याला ताण असला की केस पांढरे होतात, असे नेहमी म्हटले जाते. पण यात फार तथ्य नाही. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, केसांचा रंग पांढरा होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मेलॅनिनच्या पेशी. शरीरात मेलॅनिनच्या पेशींची निर्मिती होणे बंद होते तेव्हा केसांचा रंग बदलायला सुरुवात होते. या प्रक्रियेत मेलानोसाइट्स नावाच्या पेशी महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात पोषक घटकांचा अभाव असणे हे केस पांढरे होण्यामागील प्रमुख कारण आहे. संशोधकांच्या मते, मेलॅनिनची निर्मिती प्रक्रिया बंद होण्यामागील कारण म्हणजे शरीरात B-11 जीवनसत्त्वाचा अभाव. आपण हिरव्या पालेभाज्या, फळे कमी खातो. त्यामुळे आपले केस पांढरे होऊ लागतात. म्हणजेच आपल्या आहारात प्रथिने, लोह, कॉपर, आयोडिन, कॅल्शियम आणि ब जीवनसत्त्वाचा अभाव आहे. काही लोकांचे केस आनुवंशिक कारणांमुळेही पांढरे होतात. 


लंडनमधील अँड्रेस रुइज लिनारेस यांच्या टीमने केसांवर संशोधन केले. 'नेचर कम्युनिकेशन' नामक नियतकालिकात ते म्हणतात, विशिष्ट प्रकारची जनुके असलेल्या व्यक्तींचे केस लवकर पांढरे व्हायला सुरुवात होते. तसेच आपली जनुके मेलॅनिन निर्मिती करणाऱ्या पेशींमध्ये अडथळे निर्माण करू लागल्यास कमी वयातही केस पांढरे होतात. कोणताही तणाव नाही अशा लोकांचेही केस अकाली पांढरे झाले होते. मेलॅनिनची निर्मिती करणारे औषध निघाल्यास केस पुन्हा काळे करता येतील. या टीमने ब्राझील, कोलंबिया, चिली, मेक्सिको आणि पेरूसारख्या युरोपीय, अमेरिकी आणि अाफ्रिकी वंशाच्या लोकांच्या जनुकांची माहिती घेतली. त्यांच्या मते, युरोपमधील लोकांचे केस इतरांच्या तुलनेत लवकर पांढरे होण्यास सुरुवात होते.