आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान: गुंतवणूकदारांच्या मार्जिन मनीचा ३० पेक्षा जास्त ब्रोकरकडून दुरुपयोग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेबीने नुकत्याच केलेल्या चौकशीत कार्व्हीची २८०० कोटी रुपयांची फसवणूक पकडली होती

कुमुद दास 

मुंबई-गेल्या महिन्यात कार्व्ही ब्रोकरेजवर गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्याच्या दुरुपयोगाचा आरोप केला होता. काही दिवसांपूर्वी दालमिया ग्रुपने म्हटले होते की,तिच्या सहाय्यक कंपन्यांच्या डीमॅट खात्यांतून ब्रोकरने बेकायदा पद्धतीने एमएफ युनिट्स ट्रान्स्फर केले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा सहभागी असणारे असे आणखी ब्रोकर असू शकतात. प्रोफेशनल रिस्क मॅनेजर्स इंटरनॅशनल असोसिएशनचे संचालक निराकार प्रधान यांनी सांगितले की, कमीत कमी ३० ब्रोकर गुंतवणूकदारांच्या मार्जिन मनीचा दुरुपयोग करत आहेत. असे ब्रोकर उपयुक्त कायदा नसल्यामुळे फायदा उचलत आहेत.
त्यांनी सांगितले की, पॉवर ऑफ अटर्नी(पीओए)चा चुकीचा वापर होऊ नये, त्यासाठी गुंतवणूकदारांनी आपले डीमॅट खाते सतत तपासले पाहिजे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सेबी ब्रोकर्सला दोन खाते ठेवण्याचा सल्ला देते. एक प्रोपरायटर अकाउंट आणि दुसरे क्लाइंट अकाउंट. गुंतवणूकदारांच्या मार्जिन मनीला वेगळे ठेवले पाहिजे आणि, ब्रोकर एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर करू शकणार नाही हेही निश्चित केले पाहिजे.डीमॅट खात्यांना गुंतवणूकदारांसाठी अनेक कारणाने सुविधायुक्त मानले जाते. यामागचे कारण म्हणजे, या माध्यमातून समभाग आणि निधी सहज ट्रान्स्फर करण्याची सुविधा मिळते.कार्व्हीवरही ग्राहकांच्या रकमेचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा सुमारे २८०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते. प्राथमिक तपासात कंपनीने अनेक ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मार्जिन मनीचा दुरुपयोग केला.या घटनांमुळे डीमॅट खात्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. डीमॅटमध्ये ठेवलेले समभाग किंवा म्युच्युअल फंड युनिट ट्रान्स्फर केल्यास गुंतवणूकदारांसाठी सुरक्षेचा मार्ग कोणता? ट्रान्स्फर केलेले युनिट्स ट्रेस केले जाऊ शकतात काय? अशा प्रकारच्या घोटाळ्यापासून वाचण्यासाठी कोणत्या पद्धती अंगिकाराव्यात? या संदर्भात युनियन एएमसीचे सीईओ जी.प्रदीप कुमार म्हणाले, गुंतवणूकदारांनी तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रथम- प्रत्येक व्यवहारानंतर डिपॉझटरी किंवा ब्रोकरने पाठवलेला एसएमएस लक्षात ठेवा. दुसरे- डिपॉझिटरी तिमाही आधारावर देवाणघेवाणीची माहिती देते, गुंतवणूकदारांनी प्रत्येक व्यवहारावर बारकाईने तपासणी केली पाहिजे आणि अनियमितता अाढळल्यास स्पष्टीकरण मागा. तिसरे- गुंतवणूकदारांनी डीमॅट खाते तपासत राहावे.

डिपॉझिटरीसह डीमॅट खात्यात मोबाइल क्रमांक, ईमेल अपडेट करत राहा

पॉवर आॅफ अटर्नीचा दुरुपयोग विश्वासघात करणे
 
नियम गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी बनवले जातात. ही बाबत नियम
मोडण्याची नव्हे तर विश्वासघाताची आहे. पॉवर ऑफ अटर्नी अॅडमिनिस्ट्रेशन उद्देशांसाठी अन्य कोण्या कामासाठी नाही. अशा प्रश्न हा की, या स्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावे? पीओए विश्वासावर आाधारित आहे.जयदीप हंसराज, एमडी आणि सीईओ, कोटक सिक्युरिटीज

२०२० पासून समाप्त होऊ शकेल पॉवर ऑफ अटर्नी

ब्रोकरला पीओए का देतात?
 
याच्या माध्यमातून ब्रोकर गुंतवणूकदााऐवजी सेंटमेंट करू शकतात व हे नफ्यात सिक्युरिटीप्रमाणे काम करतात.

कशी काळजी घ्यावी?
 
सर्व मोठ्या बँकांच्या ब्रोकरर शाखा आहेत आणि त्या सुरक्षित मानल्या जातात. ब्रोकरला बँकिंग व वित्तीय देवाणघेवाणीची संर्व माहिती देऊ नका.

२०२० मध्ये काय बदल होईल?
 
इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी सिस्टिमनंतर पीओए देण्याची गरज राहणार नाही.
बचत खात्यातून  खरेदीवेळीच पैसे ट्रान्सफर करा
डिपॉझिटरीवेळी मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी अपडेट असेल याकडे लक्ष दिले पाहिजे. {दर व्यवहानंतर डिपॉझिटरीने पाठवलेले एसएमएस, ईमेल स्टेटमेंट तपासत राहा. {दर महिन्यास ब्रोकरकडून जारी केल्या जाणाऱ्या होल्डिंग स्टेटमेंटची तपासणी करा. { ब्रोकर घोटाळा करत असेल तर त्या स्थितीत तुम्ही डिपॉझिटरीला वेळेत तक्रार करायला हवी. { ब्रोकिंग अकाउंटमध्ये अतिरिक्त पैसे ठेवणे टाळा.{ बचत खात्यात खरेदीवेळी पैसे ट्रान्सफर करा. { आॅफलानइमध्ये ब्रोकरजवळ स्वाक्ष्ररी डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप नको.
 

बातम्या आणखी आहेत...