आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोरी : नागेश्वर राव सीबीआयचे प्रभारी संचालक, स्वतःच्याच कार्यालयावर तीन दिवसांत दुसरा छापा, अस्थाना-वर्मा सक्तीच्या रजेवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीबीआयचे दोन वरिष्ठ अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यानंतर बुधवारी केंद्राने जॉइंट डायरेक्टर एम नागेश्वर राव यांची सीबीआयच्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती केली. लाचखोरी प्रकरणची चौकशी सुरू असेपर्यंत सीबीआयप्रमुख आलोक वर्मा आणि दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. दरम्यान, सीबीआयने बुधवारी तीन दिवसांत त्यांच्याच मुख्यालयावर दुसऱ्यांदा छापा टाकला आहे. सोमवारीही याठिकाणी छापा टाकण्यात आला होता. अस्थाना आणि त्यांच्या टीमच्या एका डीएसपीवर मांस उद्योजक मोइन कुरेशीशी संबंधित मनी लाँडरींग प्रकरणात तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. 

 
अस्थानांनी एफआयआरला हायकोर्टात दिले आव्हान 
सीबीआईने या प्रकरणात त्यांचेच स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. तसचे अस्थानाच्या एसआयटीतील डीएसपी देवेंद्र कुमारला अटक केली आहे. अस्थाना यांनी मंगळवारी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करत त्यांच्या विरोधातील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. कोर्ट या प्रकरणी 29 ऑक्टोबरला सुनावणी करणार आहे. तोपर्यंत अस्थानांच्या विरोधात कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. 

 
सीबीआयमध्ये प्रथमच दोन मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये वाद 
>> 2016 मध्ये सीबीआयमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राहिलेले आरके दत्ता यांची बदली गृह मंत्रालयात करून अस्थाना यांची नियुक्ती करण्यात आली होती. 
>> दत्ता हे भावी संचालक समजले जात होते. पण गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांना सीबीआयचे प्रभारी संचालक बनवले आहे. 
>> अस्थाना यांच्या नियुरक्तीला वकील प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मधअये आलोक वर्मा यांनी सीबीआय चीफ बनवण्यात आले. 
>> सीबीआई चीफ बनल्यानंतर आलोक वर्मा यांनी अस्थाना यांना स्पेशल डायरेक्टर बनवण्यास विरोध केला. ते म्हणाले होते की, अस्थाना यांच्यावर अनेक आरोप आहेत. ते सीबीआयमध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीत. 
>> वर्मा 1984 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. 
 

मोइन कुरेशी प्रकरणाच्या चौकशीने सुरू झाला वाद 
1984 आयपीएस बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी अस्थाना यांनी मांस उद्योजक मोइन कुरेशी प्रकरणाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत होते. कुरेशीला ईडीने मनी लाँडरिंग आरोपांमध्ये गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात हैदराबादचा सतीश बाबू सनाही चौकशीच्या फेऱ्यात अडकला. सीबीआय तेव्हा 50 लाखांच्या ट्रान्झॅक्शची चौकशी करत होती. अनेकदा चौकशी झाली. सना यांनी सीबीआय चीफला तक्रार करत म्हटले होते की, अस्थाना यांनी या प्रकरणात क्लीन चीट द्यायला 5 कोटी मागितले होते. त्यात 3 कोटी अॅडव्हान्स दिले होते तर 2 कोटी नंतर द्यायचे होते. 

 
दलालानेही दिला दुजोरा 
सीबीआयने गेल्या आठवड्यात एका दलालाला अटक केली होती. त्यानेही सांगितले होते ती, अस्थानाला मांस उद्योजक कुरेशीकडून 2 कोटींची लाच देण्यात आली होती. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...