आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 आयएएस-आयपीएस अधिकार्‍यांवरही भ्रष्टाचाराचा आरोप; कोणी 800 कोटींचा मालक, तर कोणी नातेवाईकांच्या नावावर केल्या 100 FD

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सीबीआयचे दोन मुख्य अधिकारी लाचप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यात केंद्र सरकारने सहसंचालकपदी असलेल्या नागेश्वर राव यांची चौकशीसाठी एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. चौकशी सुरु असेपर्यंत सीबीआयचे मुख्य अधिकारी आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने आपल्या मुख्य संचालकावर मांस व्यावसायिक मोइन कुरैशी याच्याकडून 3 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे.

 

कोण आहेत हे 7 आयएएस-आयपीएस अधिकारी, ज्यांच्यावर झाली कारवाई?

या 7 अधिकार्‍यांपैकी कोण कुबेर बनला तर कोणावर असोसिएशननेच महाभ्रष्ट असल्याचा ठपका ठेवला.

 

ए मोहन, आंध्र प्रदेश
> 2016 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये अँटी करप्शन ब्युरोच्या छापेमारी कारवाई पूर्व गोदावरी जिल्हयातील परिवहन उपायुक्त ए. मोहन यांच्याजवळ अनेक राज्यांमध्ये 800 कोटी रुपयांची स्थावर- जंगम मालमत्ता असल्याचे समोर आले होते.
> कारवाईदरम्यान त्यांचाजवळ 14 फ्लॅटचे दस्ताऐवज त्याचबरोबर 2 किलो सोने आणि 5 किलो चांदी सापडली होती.
> अहवालानुसार, मोहन यांची मोठी मुलगी तेजश्रीच्या नावावर 8 विनावी कंपन्या बनवल्या होत्या. या कंपन्यांचा टर्नओव्हर जवळपास 100 ते 120 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते.

 

डॉ. ई रमेश, मध्य प्रदेश
> 2013 मध्ये आयएएस डॉ. ई रमेश याची पत्नी कुरंगति सपना कुमार यांनी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्य सचिव आर परशुराम यांना पत्र लिहून आपला पती भ्रष्टाचारी असल्याचे सांगून सर्वत्र खळबळ उडवून दिली होती.
> सपना कुमार यांच्यामते, ई रमेश हा मोठ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांपैकी एक आहे. पत्नीने केलेल्या गंभीर आरोपानंतर रमेश यांची मध्य प्रदेशातील सागर येथील आयुक्त पदावरुन रमेश यांच्या उचलबांगडी झाली होती. नंतर रमेश यांची आंध्र प्रदेशात प्रतिनियुक्ती निवड झाली होती.
> ई रमेश आपली विनावी मालमत्ता व्यवस्थितरित्या मार्गी लावण्यासाठी आंतरराज्यात उपपदावर गेला होता. 1999 मध्ये ई रमेशला मध्ये प्रदेश कॅडर मिळाले होते, असा सपना यांनी आरोप केला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... उर्वरित भ्रष्‍ट आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांविषयी...   

 

बातम्या आणखी आहेत...