आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 IPS: कोणी छोट्या-छोट्या गोष्टींवर काढत होते रिव्हॉल्वर तर कोणी आता 'मोस्ट वॉन्टेड'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - CBI मध्ये सुरु असलेला अंतर्गत संग्राम वाढत चालला आहे. एजन्सीचे डायरेक्टर अलोक वर्मा आणि स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांची लढाई दिल्ली हायकोर्टात पोहोचली आहे. अस्थाना यांनी  स्वतःविरुद्धची FIR रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबरपर्यंत त्यांची अटक थांबवण्यात आली. एजन्सीने आपल्याच स्पेशल डायरेक्टरवर मीट व्यावसायिक मोईन कुरेशीकडून 3 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप लावला आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला 8 अशा IPS अधिकाऱ्यांची माहिती देत आहोत, जे कधी वादामुळे तर आपल्या कामामुळे चर्चत राहिले. यामध्ये सर्वात पहिले जाणून घेऊया, आयपीएस अस्थाना यांच्याविषयी...


कोण आहेत राकेश अस्थाना? 
- अस्थाना गुजरात कॅडरच्या 1984 बॅचचे IPS अधिकारी आहेत. हे झारखंडच्या रांची शहरातील आहेत. अस्थाना अर्धा डझनपेक्षाही जास्त प्रकरणाच्या तपासासाठी बनवण्यात आलेल्या SIT चे प्रमुख राहिले आहेत.
- 1992-2001 पर्यंत अस्थाना धनबाद CBI चे एसपी राहिले आहेत. 2001 ते 2002 पर्यंत यांनी रांची येथे CBI डीआयजी रूपात काम केले.
- त्यांच्याकडे पटना आणि कोलकाता CBI च्या डीआयजीचासुद्धा अतिरिक्त प्रभार होता. 1996 मध्ये त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली होती. एक वर्षानंतर लालूप्रसाद यांना अटक करण्यात आली होती.
- अस्थाना यांनी नेतरहाट स्कूल (झारखंड) येथून 1971 मध्ये दहावी पास केली. पुढील शिक्षण यांनी रांची आणि आग्रा येथे घेतले.
- 1984 मध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये अस्थाना आयपीएस अधिकारी बनले. त्यांचे वडील एचआर अस्थाना शाळेत फिजिक्स टीचर होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आता IPS अधिकाऱ्यांविषयी....

बातम्या आणखी आहेत...