आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी संजीव पुणाळेकर, विक्रम भावे विरोधात सीबीआयकडून पुरवणी आरोप पत्र कोर्टात दाखल  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती

पुणे - दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयने बुधवारी कोर्टात दोन आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहेत. 2013 च्या दाभोळकर खून प्रकरणातील आरोपी संजीव पुणाळेकर आणि विक्रम भावे अशी या दोघांची नावे आहेत. भाव सध्या येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. तर पेशाने वकील असलेला दुसरा आरोपी पुणाळेकर जामिनावर आहे. सीबीआयने आपले वकील प्रकाश सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरवणी आरोप पत्र कोर्टामध्ये सादर केले आहेत.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) आपले विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांच्या हस्ते आरोप पत्र दाखल केले. सहाय्यक सत्र न्यायाधीश एस.आर. नवंडर यांच्या अध्यक्षतेखालील विशेष यूएपीए न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते दाभोळकर (67) मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्याचवेळी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...