आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराविरोधात एकाच दिवशी देशात ११० जागी सीबीआयचे छापे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराविराेधात कारवाईची धडक माेहीम सुरू करत सीबीआयने मंगळवारी देशभरात ११० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. तसेच भ्रष्टाचार, शस्त्रांची अवैध तस्करी व इतर प्रकरणांत दाखल ३० गुन्ह्यांत ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी २ जुलै राेजीही सीबीआयने १२ राज्यांतील १८ शहरांत ५० ठिकाणी छापे टाकले हाेते.


सूत्रांनुसार, जाेपर्यंत छाप्यांची कारवाई पूर्ण हाेत नाही ताेपर्यंत या कारवाईत काय हाती लागले याची माहिती समाेर येऊ शकणार नाही. मायावतींच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांतील गुंतवणुकीच्या प्रकरणांचीही चाैकशी हाेत आहे. यात लखनऊ, एनसीआरच्या माजी आयएएस अधिकाऱ्यांच्या संपत्तीसह ११ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह यांच्या प्रकरणातही कारवाई हाेत आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, हिमाचल, पंजाब, हरियाणा, आंध्र, कर्नाटक व बिहारमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. यात भरतपूर, मुंबई, चंदिगड, जम्मू, श्रीनगर, पुणे इत्यादी शहरेही आहेत.