आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तडफदार IAS बी चंद्रकला यांच्या घरी CBI छापेमारी, या एका चुकीमुळे CBI मारली धाड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लखनऊ : सीबीआयने शनिवारी आयएएस बी.चंद्रकला यांच्या लखनऊ येथील निवासस्थानासह 12 ठिकाणी छापेमारी केली. 2012 सालच्या हमीरपूर येथील खनन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सीबीआयने चंद्रकला यांच्या निवासस्थानाशिवाय लखनऊ, नोएडा, हमीरपूर, जालोन आणि कानपूर येथे बसपा आणि सपाच्या नेत्यांच्या घरी देखील छापा मारला. बी.चंद्रकला सध्या दिल्ली येथे कार्यरत आहेत. 

 

हमीरपूरमध्ये मिळाली होती पहिली पोस्टिंग, येथे अवैधरित्या जारी केले 60 पट्टे

- 2008 बॅचच्या आयएएस असलेल्या बी.चंद्रकला यांची पहिली पोस्टिंग अखिलेश सरकारच्या काळात हमीरपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यास आली होती. त्यांनी 2012 मध्ये सपा नेत्यांना अवैधरित्या खननचे 60 पट्टे जारी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कारण हे पट्टे ई-टेंडरद्वारे देण्यात येणार होते. पण त्यांनी अवैधरित्या सपाच्या नेत्यांना दिले होते. सीबीआयने चंद्रकला यांच्या लखनऊ येथील सफायर अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 101 मध्ये शनिवारी छापा मारला. यावेळी चंद्रकला तेथे हजर नव्हत्या. सीबीआय टीमने तेथून महत्वपूर्ण दस्तावेज जप्त केले आहेत.  

- सीबीआयने या प्रकरणाबाबतच हमीरपूर येथे बसपा नेता सत्यदेव दीक्षित आणि सपा एमएलसी रमेश मिश्रा तसेच जालोनमध्ये बसपा नेता रामअवतार आणि करनसिंह राजपूत यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. 

 

हायकोर्टने 2015 मध्ये सीबीआयला दिले तपासणीचे आदेश 

2015 मध्ये अवैध खननवर कारवाई करण्याच्या मागणी संदर्भात अलाहाबाद हायकोर्टत एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल झाल्यानंतर हायकोर्टाने 16 ऑक्टोबर 2015 रोजी हमीरपूर येथे जारी करण्यात आलेल्या सर्व 60 मुरूम खननचे पट्टे अवैध असल्याचे घोषित करत रद्द केले होते. अवैध खननबाबत मिळणाऱ्या तक्रारी आणि याचिकेवर सुनावाणी करताना हायकोर्टाने 28 जुलै 2016 रोजी यासंदर्भात तपासणीची जबाबदारी सीबीआयकडे सोपविली होती. 

 

कोण आहे बी.चंद्रकला?

- बी.चंद्रकलाचा जन्म तेलंगनातील करीमनगर जिल्ह्यात झाला. त्या 2008 च्या बॅचच्या IAS आहेत. त्यांनी केंद्रीय शाळेतून 12 वी पास झाल्या आहेत. हैदराबादच्या कोटी येथील वुमन्स कॉलेजमधून पदवी घेतली आहे. बी.चंद्रकला यांचा IAS होण्याचा प्रवास खूप संघर्षमय होता.  

- चंद्रकला यांनी लग्नानंतर डिस्टेंस शिक्षणाद्वारे अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. यानंतर यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. चंद्रकला यांच्या IAS होण्यामागे त्यांच्या पतीचा मोलाचा वाटा आहे. त्या सध्या एका मुलीच्या आई आहेत.