आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी, आयएनएक्स मीडिया प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चिदंबरम यांना त्यांच्या निवासस्थानावरून अटक करण्यात आली होती - Divya Marathi
बुधवारी चिदंबरम यांना त्यांच्या निवासस्थानावरून अटक करण्यात आली होती

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना गुरुवारी दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चिदंबरम यांनी चौकशीसाठी सहकार्य केले नसल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले. सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने चिदंबरम यांना 100 प्रश्न विचारायचे आहेत. 
 

सीबीआयने बुधवारी रात्री केली होती अटक 
सीबीआयने आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक केली. यानंतर सीबीआयचे अधिकारी अर्थमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानाहून सीबीआय मुख्यालयात घेऊन गेले. याअगोदर चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली होती. परिषदेनंतर ते जोरबाग येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले होते. सीबीआयचे पथक देखील त्यांच्या पाठोपाठ तेथे दाखल झाले होते. काही वेळ गेट वाजवल्यानंतर सीबीआय पथकाने भिंतीवरून उड्या मारून घरात प्रवेश केला होता.
 

चिदंबरम यांनी सीबीआय मुख्यालयात काढली रात्र 
दरम्यान सीबीआयच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, चिदंबरम यांना कोर्टाच्या अटक वॉरंटच्या आधारावरच अटक करण्यात आली आहे. अटत केल्यानंतर चिदंबरम यांना वैद्यकीय तपासणीसाठी राम मनोहर लोहिया रुग्णलयात नेण्यात आले. चिदंबरम यांनी सीबीआय मुख्यालयातील अतिथी गृहाच्या सुइट नंबर 5 मध्ये ठेवण्यात आल्याचे सु्त्रांनी सांगितले. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...