आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई : दहावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर बारावीची 15 फेब्रुवारीपासून; लोकसभा निवडणुकीमुळे आधीच परीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सीबीएसईने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे या परीक्षा आधीच घेण्याचा निर्णय झाला आहे.

 

दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होऊन २९ मार्चपर्यंत चालणार आहे. बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ३ एप्रिलपर्यंत चालतील. सर्व परीक्षांच्या वेळा सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेदरम्यान असतील. विद्यार्थ्यांना १० वाजता उत्तरपत्रिका तर १०:१५ वाजता प्रश्नपत्रिका दिल्या जातील.  विद्यार्थ्यांना तयारीसाठी जास्त वेळ मिळावा म्हणून सीबीएसईने यंदा सात आठवडे म्हणजे पावणेदोन महिन्यांआधीच वेळापत्रक जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...