आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तके फेस, अभ्यासाला इन्स्टा करा; डिलीटचा पर्याय आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - बोर्डाची परीक्षा... हे शब्द एेकताच मुलांना प्रचंड दडपण येत असते.  राजस्थानसह अनेक राज्यांत बोर्डाची बारावीची व सीबीएसईच्या १० वी-१२ वीच्या परीक्षा सुरू अाहे. बाेर्डाची १०वीची परीक्षा १४ मार्चपासून सुरू हाेतेय. जाणून घ्या परीक्षेची भीती घालवण्याचा मंत्र सीबीएसईच्या अध्यक्ष अनिता, नामांकित लेखिका जे.के.राेलिंग व आध्यात्मिक गुरू जग्गी महाराजांकडून...त्याशिवाय पुढील संकेतस्थळाला भेट देऊन परीक्षेबद्दलच्या टिप्सही मिळवू शकता- https://www.teentalkindia.com 

शिक्षणतज्ज्ञ : सीबीएसईचे विद्यार्थ्यांना पत्र... जीवनकाैशल्ये डाऊनलोड करा
पुस्तकांना ‘फेस’, अभ्यासाला ‘इन्स्टा’ व ‘स्टुडंटअनस्टॉपेबल’या हॅशटॅगला ट्रेंड करा. तुमच्यासाठी अभ्यासाची ही वर्षे महत्त्वाची अाहेत. कारण या काळात विद्यार्थ्यांच्या हार्ड-डिस्कमधील ‘स्पेस’ सर्वात जास्त ग्रहणशील असते. त्यामुळे बुद्धीच्या ‘वेब ब्राऊजर’चा विस्तार करून जीवनकाैशल्यांना डाऊनलोड करा. . स्वत:चे शिक्षण अधिक दर्जेदार व परिणामकारक बनवण्यासाठी ‘ऑटोकरेक्ट’, ‘बॅकस्पेस’, ‘पॉज’ व ‘शिफ्ट’ किंवा ‘डिलीट’ यासारखे पर्याय सदैव उपलब्ध अाहेत, हे कधीही विसरू नका. परीक्षा म्हणजे काेणतेही यश किंवा पराभव ठरवण्याचे परिमाण नव्हे. हा एक जीवन उन्नत करणारा ‘यूआरएल’ अाहे. - अनिता करवाल, अध्यक्ष, सीबीएसई (विद्यार्थ्यांना लिहिले पत्र)


लेखिका...जीवन हे पात्रता, सीव्हीवर अवलंबून नसते... 
गुण कितीही मिळाेत, जर तुम्ही शिकताना १०० % परिश्रम केले असतील तर यश मिळणे निश्चित समजा. हे जीवन केवळ अापली पात्रता व सीव्हीवर अवलंबून असते, असे कदापि समजू नका. हल्ली नाेकरी देणारे केवळ गुण पाहत नाहीत, तर जगाला समजण्याची लालसा, नवीन लाेकांना भेटण्याची इच्छा व सतत नवीन काैशल्ये शिकण्याची जिज्ञासा त्यांना पाहायची असते.  -जे.के.राेलिंग, हॅरी पॉटरच्या लेखिका


आध्यात्मिक गुरू... गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचे शिकणे महत्त्वाचे
अापण शाळा किंवा महाविद्यालयात का जाताे? याचा सर्वप्रथम विचार करा. काही तरी शिकण्यासाठी की स्वत:ला सिद्ध करण्यासाठी? जे वाचले ते उत्तरपत्रिकेत लिहा व जे वाचले नाही ते साेडून द्या. परीक्षेत कमी किंवा जास्त गुण मिळणे नव्हे, तर सतत शिकत राहणे महत्त्वाचे अाहे. परीक्षेची भीती केवळ एक आभास अाहे, ते वास्तव नाही. -सद्गुरू जग्गी महाराज, ईशा फाउंडेशन

बातम्या आणखी आहेत...