Home | Business | Industries | cci-issued-new-laws

सीसीआयचे नियम ग्राहकांच्या हितासाठी: सीसीआय

वृत्तसंस्था | Update - May 19, 2011, 04:48 PM IST

ग्राहकांच्या हितासाठी कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही कंपनीचा एकाधिकार राहु नये म्हणून सीसीआयने नवीन नियम जारी केले आहेत.

  • cci-issued-new-laws

    नवी दिल्ली - ग्राहकांच्या हितासाठी कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही कंपनीचा एकाधिकार राहु नये म्हणून सीसीआयने नवीन नियम जारी केले आहेत. यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांची अधिग्रहणे आणि विलय यात कोणतेही अडथळे येणार नाहीत असे भारतातील स्पर्धात्मकतेवर नजर ठेवणारे प्राधिकरण सीसीआयने म्हटले आहे.

    कंपन्यांची अधिग्रहणे आणि विलयासंदर्भात सीसीआयने जारी केलेल्या नियमांमुळे अडथळे निर्माण होणार नाहीत, उलट आम्ही व्यावहारिक दृष्टीकोन बाळगणार आहोत; आपली अर्थव्यवस्था मुक्त असल्याने तिचे नियमन होणे आवश्यक आहे. कंपन्यांची अधिग्रहणे व विलय सीसीआयच्या कक्षेत आल्याने ग्राहकांचे हित साधले जाईल अशी माहिती सीसीआय (भारतीय स्पर्धात्मकता आयोग) चे अध्यक्ष धमेंद्र कुमार यांनी दिली आहे.

    एक जून पासून प्रचंड मूल्याची अधिग्रहणे आणि विलय यासाठी सीसीआयची मंजूरी आवश्यक होणार आहे. यासाठी कंपन्यांना किमान ५०,००० रूपये शुल्क आकारले जाईल व काही विशिष्ट प्रकरणात ते १० लाखांपेक्षा जास्त असेल.

Trending