• Home
  • National
  • CCTV confirms the identity of the 53 accused of CAA violence in Muzaffarnagar

कारवाई / मुजफ्फरनगरमध्ये सीएए हिंसाचारातील ५३ आराेपींची सीसीटीव्हीने पटली ओळख

  • आराेपींकडून २३ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक नुकसान भरपाई घेणार
  • दंडासाठी एकूण ९१ लाख रुपयांची रक्कम निश्चित
     

वृत्तसंस्था

Feb 14,2020 09:47:00 AM IST
मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरमध्ये गेल्या वर्षी नागरिकता संशाेधन कायद्याच्या विराेधात झालेल्या आंदाेलनानंतर भडकलेल्या हिंसाचाराबद्दल ५३ आराेपींकडून २३ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, २० डिसेंबरला सीएएच्या विराेधात शहराच्या विविध भागांत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारावर आराेपींची आेळख पटवण्यात आली. या सर्वांना सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल नुकसान भरपाई करण्याबाबत नाेटिसा पाठवण्यात आल्या. या प्रकरणी न्यायालयानेही या आेळख पटवण्यात आलेल्या ५३ आराेपींकडून २३ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात यावी असे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले अपर जिल्हाधिकारी (प्रशासन) अमित सिंह यांनी संबंधित पाेलिस ठाण्यांकडून आरोपींविषयी अधिक पुरावे मागितले आहेत. त्या आधारावर आराेपींच्या मालमत्तेतून नुकसान भरपाई होईल. या प्रकरणात एडीएम प्रशासनाला पोलिसांनी ५३ आरोपींविरुद्ध ठोस पुरावे दिले आहेत. सिव्हिल लाइन पाेलिस ठाण्याने ५९ जणांची नावे दिली आहेत. यामध्ये आराेपी सरफराज इम्रान कालाेनी आणि मुजफ्फर अली (महमूदनगर) यांच्या नावाचा अहवालामध्ये दाेन वेळा उल्लेख आहे. यातील चार आराेपी अल्पवयीन निघाले. सिंह म्हणाले, पोलिस स्टेशन परिसरातील उपद्रवादरम्यान झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन सहायक विभागीय परिवहन अधिकारी व पोलिस विभागाने केले.
X