आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकिंग CCTV फुटेज : पदराआड नवजात बाळाला लपवून हॉस्पिटलमधून फरार झाली महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजमेर, राजस्थान : येथील लेडी हॉस्पिटलमध्ये नवजात बाळाच्या चोरीचे धक्कादायक CCTV फुटेज समोर आले आहे. व्हिडिओमध्ये एक महिला पदराआड वॉर्डमधील एक बाळ लपवून घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहे. परंतु बाळाच्या आईची सजगता आणि स्टाफच्या दक्षतेमुळे बाळ पाच मिनिटांच्या आत सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. भीतीपोटी बाळ तेथेच हॉस्पिटलबाहेर ठेवून महिला पळून गेली.


- ग्वालियर निवासी जवान राजपाल यांची पत्नी सपनाची 11 ऑक्टोबरला जनाना हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली होती. राजपाल यांच्यानुसार 12 ऑक्टोबरला पहाटे साडेतीन वाजता महिला चोर न्यू गायनीक वॉर्डमध्ये दाखल झाली आणि काही सेकंदातच बाळ उचलून घेऊन जाताना दिसली. बाळ जवळ नसलेले पाहून पत्नीने राजपाल यांना लगेच कॉल केला.


- राजपाल यांनी स्टाफला जागे करून अलर्ट केले. त्यानंतर हॉस्पिटलचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. 5 मिनिटांनी नर्सरीबाहेर कपड्यात ठेवलेले बाळ आढळून आले. महिलेचा काहीही शोध अजूनही लागलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...