आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला गेटवर आपटून लाथा-बुक्क्या घालत होता पती, सासरा देत होता चिथावणी.. सुनेवर होती वाईट नजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिगड - लालचेमुळे माणूस कसा राक्षस बनतो याचा पुरावे देणारे एका घटनेचे सीसीटिव्ही फुटेज नुकतेच समोर आले आहे. पतीने हुंड्यासाठी पत्नीला घराच्या गेटवर आपटून निर्दयीपणे बेदम मारहाण केली. महिलेचा सासराही त्याठिकाणी होता, मुलाला समजावण्याऐवजी तो त्याला चिथावणी देत होता. महिलेच्या आरोपानुसार सासऱ्याची सुनेवर वाईट नजर होती. महिलेने पोलिस ठाण्यात मदत न मिळाल्याने वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली. 


क्वारसी परिसरातील नगला मानसिंह येथील रहिवासी असलेल्या अंजू यांचे लग्न फेब्रुवारी 2018 मघ्ये संघप्रिय गौतम याच्याशी झाले होते. अंजूने सांगितले की, तिच्या वडिलांनी हुंड्यापोटी 10 लाख रुपये दिले होते. त्याशिवाय 2 बिघे जमीनही पतीच्या नावे केली होती. पण लग्नाच्या महिनाभरानंतरच सासरचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देऊ लागले होते. 


अंजूने तक्रारीत केलेल्या आरोपानुसार तिचा पती कारची मागणी करत होता. त्यानंतर तिला अगदी लहानसहान गोष्टींवरून मारहाण करण्यास सुरुवात झाली. घटनेच्या दिवशीही तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. पतीपासून वाचण्यासाठी ती घराबाहेर पलाली पण गेट बंद होते. तेव्हा तिला गेटवर आपटून आपटून मारण्यात आले. हातावर चटके दिल्याच्या जखमाही या महिलेने दाखवल्या. 

बातम्या आणखी आहेत...