आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ceasefire Violation | Jammu Kashmir News Updates: Indian Army Responded To Pakistani Ceasefire Violation

पाकच्या गोळीबारास भारतीय सैनिकांचे चोख प्रत्युत्तर; जबाबी कारवाईत पाकिस्तानचे 2 सैनिक ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारास भारतीय जवानांनी गुरुवारी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या पाकच्या चौक्यांवर भारताने जबाबी कारवाई केली. यामध्ये पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानने गुरुवारी जारी केलेल्या माहितीनुसार, भारताच्या कारवाईमध्ये त्यांचे दोन सैनिक मारले गेले होते. तत्पूर्वी पाकिस्तानच्या सैनिकांनी उरी सेक्टरजवळ असलेल्या नियंत्रण रेषेलगत गोळीबार करत उखडी तोफा डागल्या होत्या. यामध्ये एका महिलेसह भारतीय लष्कराचे अधिकारी शहीद झाले.


गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. तंगधार आणि कंजलवाड परिसरात पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. 21 डिसेंबर रोजी राजौरी जिल्ह्यात केरी बटाल आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानकडून उखडी तोफा (मोर्टार) डागण्यात आल्या. त्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या बॅट (बॉर्डर अॅक्शन टीम) ने फायरिंग केली होती. त्यामध्ये एक भारतीय जवान शहीद झाला. तसेच भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले. 5 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासूनच पाकिस्तानकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.