आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय वर्षे ८५, क्रिकेट करिअर ६० वर्षांचे, २ लाखांपेक्षा अधिक सामने, ७ हजार विकेट, विंडीजच्या सेसिल यांची निवृत्ती जाहीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मूळ विंडीजच्या वेगवान गाेलंदाज सेसिल राइटने नुकतीच क्रिकेटच्या सर्वच फाॅरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी आपल्या ६० वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यामुळे क्रिकेटच्या विश्वात त्यांच्या नावाची फारशी चर्चा नव्हती. आता मात्र निवृत्तीच्या नुसत्या घाेषणेने त्यांनी जगाच्या कानाकाेपऱ्यातील तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. याला कारणही तसेच दमदार आहे. कारण विंडीजचा हा वेगवान गाेलंदाज आता वयाच्या ८५ व्या वर्षी निवृत्त हाेत आहे. त्याने आपल्या क्रिकेटच्या ६० वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल २ लाखांपेक्षा अधिक सामने खेळण्याचा पराक्रम गाजवला. यादरम्यान त्याच्या नावे ७ हजार विकेटची नाेंद आहे,अशा प्रकारची अपूर्व कामगिरी नाेंदवणाऱ्या सेसिलच्या निवृत्तीची चर्चा हाेणे साहजिकच आहे. सेसिल यांनी आपल्या क्रिकेट करिअरला १९५९ मध्ये सुरुवात केली. म्हणजेच आजच्या घडीला त्यांचे करिअर ६० वर्षांचे आहे. 

दिग्गजांसाेबत मैदानावर : सेसिल यांनी लीग आणि प्रथमणी क्रिकेटमध्ये दिग्गज क्रिकेटपटू गॅरी साेबर्स आणि रिचर्ड॰स यांच्यासाेबत सामने गाजवले आहेत. 

‘मनात आले तसे करा’ हाच यशाचा मूलमंत्र 
 मनात आले तसेच करा आणि खा, त्यामुळेच तुम्हाला वेगळे काही तरी करता येईल, याच शब्दातून सेसिल यांनी दीर्घकाळापर्यंत क्रिकेटचे मैदान गाजवण्याच्या यशाचा मूलमंत्र सांगितला आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर विल्फ्रेड यांचे सर्वात दीर्घकाळ करिअर
> विल्फ्रेड, इंग्लंड 
30 वर्ष, 315 दिवस 


> ब्रायन क्लोज, इंग्लंड
26 वर्ष, 356 दिवस


> वुली, इंग्लंड
25 वर्ष 13 दिवस


> जॉर्ज हेडली, विंडीज
24 वर्ष, 10 दिवस


> सचिन तेंडुलकर, भारत
24 वर्ष, एक दिवसबातम्या आणखी आहेत...