Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Celebrate the birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी; दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 09:28 AM IST

आंबेडकर जयंतीला फेस्टिव्हल अॅडव्हान्स

 • Celebrate the birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar


  नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती येथे उत्साहात साजरी केली. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने रविवारी सकाळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर अनुयायांनी डॉ. बाबासाहेबांना मानवंदना दिली. दीक्षाभूमीवर अनुयायांनी मोठी गर्दी केली हाेती. जयंतीनिमित्त चौकाचौकांत रोषणाई करण्यात आली होती.

  आंबेडकर जयंतीला फेस्टिव्हल अॅडव्हान्स
  दिवाळी, ईद, ख्रिसमस आदी नऊ सणांसाठी मिळणारा फेस्टिव्हल अॅडव्हान्स आता आंबेडकर जयंतीलाही मिळणे सुरू झाले आहे. आंबेडकर जयंतीलाही दहा हजार रुपयांचा सण अग्रिम राशी मिळणे सुरू झाले.

  ड्रॅगन पॅलेसही सजले :

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेसवरही विद्युत रोषणाई करण्यात आली. रविवारी सकाळी भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.

Trending