Home | National | Other State | Celebrating the birth anniversary of Tipu Sultan by leaving BJP behind

भाजपचा विराेध डावलून टिपू सुलतान यांची जयंती साजरी

वृत्तसंस्था | Update - Nov 11, 2018, 07:57 AM IST

मुख्यमंत्री ए.डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर जयंती कार्यक्रमापासून दूर राहिले.

  • Celebrating the birth anniversary of Tipu Sultan by leaving BJP behind

    बंगळुरू - भारतीय जनता पक्ष आणि दक्षिणपंथी संघटनांचा विरोध डावलून शनिवारी कर्नाटकात टिपू सुलतान जयंती साजरी झाली. अनेक जिल्ह्यांत जमावबंदी लागू हाेती. जयंतीविराेधात निदर्शने करणारे भाजपचे ३ आमदार व कार्यकर्त्यांना अटक झाली. वाद वाढल्याने मुख्यमंत्री ए.डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर जयंती कार्यक्रमापासून दूर राहिले. डॉक्टरांच्या सल्ल्याने ११ नोव्हेंबरपर्यंत विश्रांती घेण्याच्या नावाखाली कुमारस्वामी आयोजनापासून दूर होते.

    निमंत्रण पत्रिकेवरही त्यांचे नाव नव्हते. जी. परमेश्वर यांना विधानसभेतील मुख्य कार्यक्रमाचे उद‌्घाटन करायचे होते. पण ते शहराबाहेर असल्याचे कारण सांगितले गेले. मुख्यमंत्री सहभागी न झाल्याने सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला हाेता.

Trending