आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रेशन : 7 वर्षांच्या आराध्याने केला डान्स, कान्समध्ये जाण्यापूर्वी मुलीला चीयर करण्यासाठी पोहोचली ऐश्वर्या राय बच्चन 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 72 वे कान्स फिल्म फेस्टिवलसाठी निघण्यापूर्वी ऐश्वर्या राय मुंबईमध्ये मुलगी आराध्याला चीयर करण्यासाठी पोहोचली होती. कोरियोग्राफर श्यामक डावरच्या 25 व्या समर फंक शोचा हा प्रसांग होता. जो शनिवारी त्याच्या स्टूडियोमध्ये झाला. 7 वर्षांच्या आराध्यानेही या इव्हेंटमध्ये परफॉर्म केले. केवळ ऐश्वर्याच नाही तर तिचा पती अभिषेक बच्चन, आई वृंदा राय, सासू जया बच्चन आणि नणंद श्वेतादेखील यावेळी आराध्याला चीयर करण्यासाठी तिथे हजर होते. मात्र अमिताभ बच्चन या इव्हेंटमध्ये कुठेच दिसले नाही.  

 

19 मेनंतर कान्समध्ये दिसू शकते ऐश्वर्या... 
16 वेळा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्याने सहभाग नोंदविला आहे. आता पुन्हा एकदा ती रेड कार्पेटवर दिसणार आहे. अद्याप कोणतीही फायनल डेट समोर आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, 19 मेनंतर ती कान्समध्ये सामील होणार आहे. 2002 मध्ये ऐश्वर्या पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर चालली होती. तेव्हा ती तेथे संजय लीला भन्साळींच्या दिग्दर्शनात बनलेली फिल्म 'देवदास' साठी गेली होती. तिच्यासोबत शाहरुख खान आणि भन्साळीदेखील तिथे होते.