आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : गोयल यांनी ही एक घोषणा करताच सुरू झाले सेलिब्रेशन..लोकसभेत झाल्या मोदी-मोदीच्या घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोकप्रिय घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र सर्वात मोठी घोषणा ठरली ती करदात्यांना दिलासा देणारी. विशेष म्हणजे पीयूष गोयल यांनी संसदेत ही घोषणा करताच भाजपच्या खासदारांनी बाके वाजवत एकच सेलिब्रेशन केले. 


मिनिटभर सुरू होते सेलिब्रेशन..
पीयूष गोयल यांनी लोकसभेत वार्षिक 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार अशी घोषणा करताच भाजप खासगदारांनी एकच सेलिब्रेशन सुरू केले. सर्वच खासदारांनी बाके वाजवत आणि घोषणाबाजी करत या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. या संपूर्ण सेलिब्रेशनमुळे पीयूष गोयल यांना जवळपास एक मिनिटभर भाषण थांबवावे लागल्याचे पाहायला मिळाले. 


मोदी-मोदीच्या घोषणा 
खासदारांनी सेलिब्रेशन करताना जल्लोषात घोषणाबाजी केली. काही क्षणांतच या घोषणाबाजीमध्ये मोदी-मोदी अशा घोषणांना सुरुवात झाली. मध्यमवर्गाला दिलासा देणाऱ्या या घोषणेनंतर भाजप खासदारांनी जणू मोदींच्या नावाच्या घोषणा देत त्यांचे याबाबत आभार मानले. 


मोदींनीही केले सेलिब्रेशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला. पीयूष गोयल यांच्या घोषणेनंतर मोदी यांनी उत्साहात बाके वाजवत या निर्णयाचे स्वागत केले. गोयल यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान मोदींनी अनेक घोषणांच्या वेळी बाक वाजवून आंद व्यक्त केला.  

 

Video - लोकसभेत अशाप्रकारे झाले सेलिब्रेशन

Historic announcement to exempt individual income of up to Rs 5 lakh/year

Seemingly unending chants of ‘Modi-Modi’ follow. #BudgetForNewIndia pic.twitter.com/qno5LH1hjO

— BJP (@BJP4India) February 1, 2019

 

बातम्या आणखी आहेत...