आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांत निरुत्साह, लाेकसभेपेक्षा टक्केवारी घटली; राजकीय नेत्यांसह प्रमुख सेलिब्रिटींची मात्र उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रांवर हजेरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबईकरांनी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावत भरघोस मतदान केले होते. विधानसभेलाही हाच ट्रेंड कायम राहील अशी अपेक्षा होती. परंतु तीन दिवस सुटी आल्याने म्हणा वा आवडीचा उमेदवार नसल्याने म्हणा, मुंबईकरांनी या वेळी मतदानात निरुत्साह दाखवला. विशेष म्हणजे तरुणाईही या वेळी मतदानासाठी बाहेर पडली नाही. २०१४ मध्ये ५२ टक्के मतदान करणाऱ्या मुंबईकरांनी यंदा सायंकाळी पाच वाजेपर्यंत फक्त ५० टक्क्यांच्या अातच मतदान केले. १९९९ मध्ये हे प्रमाण ४४.९ टक्के होते. 

मुंबईत सकाळी पावसाचे मळभ होते त्यामुळे मतदान केंद्रावर विशेष गर्दी नव्हती. नंतर गर्दी वाढेल अशी अपेक्षा होती, परंतु अपवादात्मक मतदान केंद्र सोडता मतदारांची गर्दी तशी संध्याकाळपर्यंत कमीच होती. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांवर मुंबईकरांनी पाठच फिरवली. ‘मतदानाला गर्दी कमी आहे हे चांगले नाही. सरकारने मतदानाची सक्ती करावीच, पण घरी बसून मतदान करण्याची सोय करायला हवी,’ असे अभिनेता नाना पाटेकर म्हणाले.

बॉलीवूडची मंडळी मतदानाला मोठ्या संख्येने बाहेर पडली. लारा दत्ताने आपला टेनिसपटू पती महेश भूपती, कुणाल खेमूने आपल्या परिवारासोबत, हेमा मालिनी, आमिर खान, किरण राव, रितेश-जेनेलिया, दिया मिर्झा, नसिरुद्दीन शहा, माधुरी दीक्षित नेने, कैलास खेर, जॉन अब्राहम, सोनाली कुलकर्णी, ऊर्मिला मातोंडकर, गुलजार, किशोरी शहाणे, प्रशांत दामले यांच्यासह अतुल कुलकर्णी यांनी मतदान केले आहे. ‘आपण मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचे याचा विचार करतो हे बरोबर नाही. पाच वर्षे आपण यावर विचार करायला हवा,’ असे अतुल कुलकर्णी म्हणाले. 

मतदान न करणारे इडियट : जावेद अख्तर
गीतकार जावेद अख्तर यांनी मतदान केल्यानंतर इतरांना मतदान करण्याचे आवाहन करताना ग्रीक भाषेत मतदान न करणाऱ्यांना ‘इडियट’ म्हटले जाते अशी बोचरी टीकाही केली, तर शबाना आझमी यांनी ‘विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत फरक असतो तो आपण समजून घेतला पाहिजे’ असे सांगत आपले स्थानिक प्रश्न कोण सोडवू शकतो याचाही आपण विचार करत नाही असे म्हटले. 
 
 

बातम्या आणखी आहेत...