आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयासोबत विदेशात न्यू ईयर सेलिब्रेट करत आहेत रजनीकांत, ऐश्वर्याही मुलगी आराध्या आणि अभिषेकसोबत सेलिब्रेशनसाठी निघाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड स्टार्स ख्रिसमस नंतर आता न्यू ईयरच्या तयारीत आहेत. साउथचे सुपरस्टार रजनीकांत फॅमिलीसोबत यूएसमध्ये न्यू ईयर एन्जॉय करत आहेत तर ऐश्वर्या रायसुद्धा मुलगी आराध्या आणि पतीसोबत न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मुंबईहुन रवाना झाली आहे. मात्र ऐश्वर्या-अभिषेक यावेळी न्यू ईयरसाठी कुठे गेले आहेत याबद्दल काही माहिती मिळालेली नाही. अशातच रजनीकांतीचा जावई धनुषने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये तो सासरे रजनीकांतसोबत ख्रिसमस आणि न्यू ईयर एन्जॉय करताना दिसला. 

 

थायलंडमध्ये न्यू ईयर सेलिब्रेट करत आहेत काजोल-अजय तर लंडनमध्ये फॅमिलीसोबत आहे शिल्पा...
अजय देवगन फॅमिलीसोबत थायलंडमध्ये न्यू ईयर सेलिब्रेट करत आहे. अजयने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये तो पत्नी काजोल आणि मुले न्यासा व युगसोबत पूल दिसत हे. यावेळी त्याच्यासोबत आणखी काही फॅमिली मेम्बर्सही आहेत. तसेच शिल्पा शेट्टीही फॅमिलीसोबत लंडनमध्ये आहे. शिल्पानेसुद्धा पती राज कुंद्रा आणि मुलासोबतचा आपला एक फोटो शेयर केला आहे. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वीच साऊथ आफ्रिकेतून मुलगा तैमूरचा वाढदिवस साजरा करून परतलेली करीना कपूरसुद्धा लंडनमध्येच एन्जॉय करत आहे. करीनाने तैमूरचा एक फोटोही शेयर केला आहे, ज्यामध्ये तैमूर सायकलवर बसलेला दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...